शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 11:42 IST

CoronaVirus In Kolhapur : कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सोमवार (दि.२८) पासून सुरू होण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने सोलापूर शहराप्रमाणे कोल्हापूर हे स्वतंत्र युनिट करता येईल का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पालकमंत्री सतेज पाटील आज, बुधवारी चर्चा करून निर्णय घेणार आहेत.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री आज चर्चा करणार कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने सकारात्मकता

कोल्हापूर : कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने कोल्हापूर शहरातील सर्व दुकाने सोमवार (दि.२८) पासून सुरू होण्याची शक्यता आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने सोलापूर शहराप्रमाणे कोल्हापूर हे स्वतंत्र युनिट करता येईल का? याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पालकमंत्री सतेज पाटील आज, बुधवारी चर्चा करून निर्णय घेणार आहेत.सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजतर्फे आयोजित बैठकीत व्यापारी, व्यावसायिकांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे केली होती. त्यावर कोरोनाबाबतच्या तपासणीचे रोजचे प्रमाण १५ हजारांपर्यंत आहे. शहराचा पॉझिटिव्हिटी रेट साडेनऊ टक्क्यांपर्यंत आहे.

दोन-तीन दिवसांत तो ७-८ टक्क्यांपर्यंत येईल, असे दिसते. त्यामुळे कोल्हापूर शहर स्वतंत्र युनिट करून सर्व दुकाने सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमवेत मंगळवारी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले होते. मात्र, काही कारणास्तव त्यांना मंगळवारी मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करता आली नाही. ते याबाबत बुधवारी चर्चा करणार आहेत.

दरम्यान, सलग तिसऱ्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा कमी आला आहे. हा रेट बुधवारी ४.६९ टक्क्यांवर आला आहे. शहरातील कोरोनाची लाटदेखील ओसरत आहे. मृत्यूदर ०.७ टक्क्यांवर आला आहे. हे चित्र सकारात्मक आहे. त्यामुळे शहरातील सर्व दुकाने सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

व्यापारी, व्यावसायिकांनी केलेल्या मागणीनुसार सर्व दुकाने सुरू करण्याबाबत परवानगी देण्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत मंगळवारी चर्चा झाली नाही. या विषयावर बुधवारी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.- सतेज पाटील,पालकमंत्री.

शहरातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असून ते चांगले आहे. त्यामुळे सोलापूरप्रमाणे कोल्हापूर हे स्वतंत्र युनिट होऊन सोमवारपासून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी निश्चितपणे मिळेल.-संजय शेटे,अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर