शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

शहरातील सर्व प्रॉपर्टी कार्ड ३१ मेपर्यंत आॅनलाईन-: प्रशासनाकडून युद्धपातळीवर काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 01:08 IST

शहरातील ४६ हजार ६०० मिळकत पत्रके (प्रॉपर्टी कार्ड ) येत्या ३१ मेपर्यंत आॅनलाईन होतील. आजपर्यंत २८ हजार मिळकती आॅनलाईन झाल्या आहेत; तर ११ हजार ६५८ बिगरशेती सातबारांचे प्रॉपर्टीकार्डात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ठळक मुद्दे बिगरशेतीची होणार मिळकतपत्रके शहरातील बिगरशेती ७/१२ चे मिळकत पत्रक करणे तसेच प्रॉपर्टी कार्ड आॅनलाईन करण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सुरू आहे.

संतोष पाटील ।कोल्हापूर : शहरातील ४६ हजार ६०० मिळकत पत्रके (प्रॉपर्टी कार्ड ) येत्या ३१ मेपर्यंत आॅनलाईन होतील. आजपर्यंत २८ हजार मिळकती आॅनलाईन झाल्या आहेत; तर ११ हजार ६५८ बिगरशेती सातबारांचे प्रॉपर्टीकार्डात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील चार हजार ७/१२ पत्रके प्रॉपर्टी कार्डात रूपांतरित झाली आहेत. प्राधिकृत अधिकाऱ्याच्या साईनसह आॅनलाईन उपलब्ध होणारी ही मिळकतपत्रके कायदेशीररीत्या ग्राह्य असणार आहेत.जिल्हा प्रशासनाकडून ७/१२ आॅनलाईन करण्याचे काम पूर्णत्वाकडे आहे.

आॅनलाईनमुळे महसूल कार्यालयातील हेलपाटे वाचतात. मिळकतीवरील फेरफार घरबसल्या पाहणे शक्य होते. या धर्तीवर शहर हद्दीतील सर्व मिळकतपत्रके आॅनलाईन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी ३० खासगी आॅपरेटर नेमण्यात आले आहेत. याची तपासणी भूमापन अधिकाऱ्यांकडून केली जाते. रोज सरासरी दोन हजार मिळकती आॅनलाईन जोडल्या जात आहेत.

शहराच्या हद्दीत सुमारे २० हजार मिळकती शेतजमिनीवर आहेत. त्यातील ११ हजार ६५८ मिळकतींच्या ७/१२ वर नोंदी शेतीतून बिगरशेतीत झाल्या आहेत. यातील चार हजार बिगरशेती ७/१२ चे प्रॉपर्टी कार्ड बनले. ज्या मिळकतींवर बिगरशेती नोंदी स्पष्टपणे झाल्या आहेत, त्या मिळकती महसूल व भूमापन कार्यालयातर्फे प्रॉपर्टी कार्डात रूपांतरित करण्याचे काम सुरू आहे. त्रुटी राहिलेले म्हणजे लेआऊट, बिगरशेती आदेश, आदी कारणांनी प्रलंबित आहेत, त्यांनी पुरावे सादर केल्यास हे ७/१२ मिळकतपत्रात रूपांतरित करण्याची सोय केल्याची माहिती भूमापन अधिकारी किरण माने यांनी दिली.मिळकत नोंदीचा फायदाशासनाच्या विविध योजनांचा लाभ, गृहकर्ज किंवा तत्सम कर्जप्रकरणे, मिळकतींचे हस्तांतरण, न्यायालयीन कामकाज, सहज पद्धतीनं मिळकतीच्या फेरबदलातील नोंदींवर लक्ष ठेवणे, आदींसाठी मिळकतीची नोंद (प्रॉपर्टी कार्ड) असणे आवश्यक आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांत खरेदी-विक्रीनंतरचा दस्त महत्त्वाचा घटक असल्याने मिळकतपत्रावर नोंदीकडे दुर्लक्ष केले जाते. दस्तनोंद महत्त्वाची आहेच, त्या जोडला मिळकत पत्रकामुळे मिळकतीची दुहेरी नोंद होत असल्याने फसवणूक टळते. 

बिगरशेती ७/१२ चे मिळकत पत्रक करणे तसेच प्रॉपर्टी कार्ड आॅनलाईन करण्याचे काम सुरू आहे. शहरातील ४६ हजार मिळकतींवर सहा लाख नोंदी आहेत. यात त्रुटी राहू नयेत याची काळजी घेतली जात आहे.- किरण माने, नगर भूमापन अधिकारी 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरonlineऑनलाइन