शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 15:10 IST

BharatBand, FarmarStrike, Ajra, Kolhapur केंद्र सरकारच्या कृषीविधेयक कायद्याच्या निषेधार्थ आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये डावे पक्ष, शेतकरी संघटना, काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, धरणग्रस्त संघटना, लोकशाहीवादी सर्व पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या. विष्णूपंत केसरकर व ओंकार माद्याळकर यांच्याहस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला.

ठळक मुद्देआजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंदबंदमध्ये सर्व पक्ष संघटना सहभागी

आजरा : केंद्र सरकारच्या कृषीविधेयक कायद्याच्या निषेधार्थ आजऱ्यात सर्वपक्षीय रॅली काढून कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदमध्ये डावे पक्ष, शेतकरी संघटना, काँगे्रस, राष्ट्रवादी काँगे्रस, शिवसेना, धरणग्रस्त संघटना, लोकशाहीवादी सर्व पक्ष संघटना सहभागी झाल्या होत्या. विष्णूपंत केसरकर व ओंकार माद्याळकर यांच्याहस्ते शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला प्रारंभ झाला.शेतकरी विरोधी कायदे रद्द झालेच पाहिजे, शेतकऱ्यांचे वाटोळे लावणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध असो, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या.रॅली संभाजी चौकात आल्यानंतर सभेत रूपांतर झाले. केंद्र सरकारच्या कृषी धोरणाविरोधात सर्वांनीच जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना न्याय द्या, स्वाभिमाथन आयोगाची अंमलबजावणी करा, कृषी विधेयक रद्द करा अशीही मागणी करण्यात आली.रॅलीत मुकूंद देसाई, जयवंत शिंपी, विष्णूपंत केसरकर, उदय पवार, अल्बर्ट डिसोझा, संपत देसाई, तानाजी देसाई, अभिषेक शिंपी, किरण कांबळे, संभाजी पाटील, युवराज पोवार, नौशाद बुढ्ढेखान, ओंकार माद्याळकर, रवी भाटले यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

 रॅलीत प्रा. डॉ. नवनाथ शिंदे यांनी महात्मा फुले यांची वेशभूषा करून सहभाग घेतला तर सभेतील मनोगतात म. फुले यांचे कृषी धोरण व त्याची अंमलबजावणी करणेची मागणी केली., एस. टी. सेवा सकाळपासूनच बंद, शाळा, महाविद्यालयाकडे विद्यार्थी फिरकलेच नाहीत.

 उत्तूर परिसरात शंभर टक्के प्रतिसादउत्तूर : कृषी विधेयक धोरणाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये उत्तूर परिसरातील जनतेने सर्व व्यवहार बंद ठेवून शंभर टक्के प्रतिसाद दिला. बंदला महाविकास आघाडी, जनता दल यांनी पाठिंबा दिला.

हलकर्णी परिसरात उत्स्फूर्त प्रतिसादहलकर्णी : हलकर्णी (ता. गडहिंग्लज) परिसरात शासकीय बँका, बस व वैद्यकिय सेवेसह अन्य अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापाऱ्यांनी व दुकानदारांनी आपले व्यवहार बंद ठेवून बंदमध्ये भाग घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख पोलिस बंदोबस्त होता. 

टॅग्स :Bharat Bandhभारत बंदFarmer strikeशेतकरी संपkolhapurकोल्हापूर