कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हुकूमशाहीमुळे देश अधोगतीला गेला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजप वगळून सर्वपक्षीय एकत्र लढा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा लोक आंदोलन समिती स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी येथे बैठकीत झाला. येथील अक्कमहादेवी मंटपात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या पुढाकाराने बैठक झाली. शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय देवणे अध्यक्षस्थानी होते.यावेळी देवणे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या कारभारामुळे शेतकरी, कामगार अडचणीत आले आहेत. वेळीच उपाययोजना न केल्याने देशात कोरोनाचा उद्रेक झाला. म्हणून मोदींविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येऊन कोल्हापुरातून लढ्याला सुरुवात करूया. पहिल्या टप्प्यात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारविरोधात ५ जून रोजी निदर्शने करूया.दिलीप पवार, संदीप देसाई यांनीही मार्गदर्शन केले. राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, चंद्रकांत यादव, नामदेव गावडे, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे, टी. एस. पाटील आदी उपस्थित होते.
मोदी-शहांविरोधात भाजप वगळून सर्वपक्ष एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 18:47 IST
Farmers Protest kolhapur: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हुकूमशाहीमुळे देश अधोगतीला गेला आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजप वगळून सर्वपक्षीय एकत्र लढा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा लोक आंदोलन समिती स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी येथे बैठकीत झाला. येथील अक्कमहादेवी मंटपात अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या पुढाकाराने बैठक झाली. शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय देवणे अध्यक्षस्थानी होते.
मोदी-शहांविरोधात भाजप वगळून सर्वपक्ष एकत्र
ठळक मुद्देमोदी-शहांविरोधात लोक आंदोलन समिती स्थापन अक्कमहादेवी मंटपातील बैठकीत निर्णय