शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

आठवणीतील ‘सारे..’

By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST

‘महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीतील जुने-जाणते नेते’

‘महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीतील जुने-जाणते नेते’ अशीच आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने या चळवळीतील हा दुवा निखळला. महाराष्ट्राच्याच नव्हे ‘देशभरातील विधिमंडळातील सर्वांत ज्येष्ठ आमदार’, ‘साखर कारखानदारीतील अभ्यासू नेतृत्व’ म्हणून ते परिचित होते. अत्यंत साधी राहणी व सतत कार्यमग्न राहणे हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य. साखर कारखानदारीबद्दल त्यांचा बारकाईने अभ्यास होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ व खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्वही शिरोळ तालुक्यातूनच उदयाला आले. त्यामुळे संघटनेच्या चळवळीची पहिली झळ सा. रे. पाटील यांच्या नेतृत्वाखालील दत्त कारखान्यास बसे; परंतु सा. रे. यांचे मोठेपण असे की, त्यांनी आजअखेर संघटनेला व शेट्टी यांनाही कारखान्यात शिरकाव होऊ दिला नाही. संघटना भक्कम होत असतानाच सा. रे. यांच्यावरील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सभासदांचा विश्वास कायम राहिला. ‘उत्तम चालविलेला कारखाना’ हे त्याचे सगळ््यात महत्त्वाचे कारण. संघटना मागते त्यापेक्षा जास्त दर देण्यात ते पुढे राहिले. ऊसदराच्या बैठकीत आम्हाला परवडत नाही, राजू (खासदार शेट्टी यांना) तूच काही तरी मार्ग काढ, असे ते विनवणी करत; परंतु नंतर मात्र सर्वाधिक उचल गनिमी काव्याने जाहीर करून संघटनेच्या आंदोलनातील हवा काढून घेत. सा. रे. पाटील यांचा आणखी एक वेगळा पैलू म्हणजे समाजवादी, ध्येयवादी संस्था-संघटना व व्यक्तींनाही ते खूप मदत करत. साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील साधना ट्रस्टच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे होते. साधना ट्रस्टचे विश्वस्त म्हणून ते तीस वर्षे काम करत होते. मागच्या सहा-सात वर्षांत ते कार्यकारी विश्वस्त झाले. एस. एम. जोशी, आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन यांचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्या विचारानेही ते प्रभावित झाले. या नेत्यांची आठवण म्हणूनच त्यांनी आपल्या हरितगृहास ‘श्रीवर्धन बायोटेक’ (‘श्री’ हा श्रीधरमधला आणि पटवर्धनमधील ‘वर्धन’) असे नाव दिले. साधना साप्ताहिकाशी त्यांचे इतक्या वर्षांचे संबंध. यदुनाथ थत्तेपासून ते आताच्या नव्या पिढीतील विनोद शिरसाठ यांच्यापर्यंत संपादक बदलले तरी त्यांचे सर्वांशी तितकेच चांगले संबंध राहिले. ‘साधना’ साप्ताहिकास वर्गणीदार मिळवून देण्यात व अंकांमध्ये सातत्याने जाहिराती देण्यात ते कायम पुढे होते, अशी वैचारिक साप्ताहिके चालली पाहिजेत, ती वाढली पाहिजेत असाच त्यांच्या त्यामागील हेतू होता. आपण मदत करतोय म्हणून माझे काहीतरी त्यामध्ये छापा, असा आग्रह त्यांनी उभ्या आयुष्यात कधीच केला नाही. आज-काल माध्यमांमध्ये जाहिरातदारांचे प्राबल्य वाढत आहे अशा काळात सातत्याने अनेक वर्षे वेगवेगळ््या मार्गाने आर्थिक मदत करूनही त्या बदलात कोणतीच अपेक्षा न करणे यातच सा. रे. यांचे मोठेपण व त्यांनी जपलेली विचारांची बांधीलकी दिसून येते. साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणजे राजकारण अशीच प्रतिमा ठळक झाली असताना सा. रे. यांनी मात्र सातत्याने सत्तेचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी किती विविधांगी पद्धतीने करता येतो हेच कृतीतून दाखवून दिले. सा. रे. यांचे दुसरे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ते कधीच थकत नव्हते. दिल्ली, मुंबईपासूनचा प्रवास असो ते स्वत:च सगळीकडे जात. मंत्री, अधिकाऱ्यांना भेटून काम करण्याबाबत आग्रह धरत. मृत्यूनंतर आपला देहसुद्धा समाजाच्या उपयोगासाठी यावा म्हणून दान करणारा हा खरा ‘समाजवादी’. तत्त्वज्ञान मृत्यूनंतरही आत्मसात करणारा. जेव्हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला त्यादिवशी दुपारी त्यांनी तत्कालीन कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांना फोन केला व आपण सगळे लढत राहायचे, आपणच नरेंद्र म्हणून काम करायचे, असा विश्वास दिला. त्या विश्वासाच्या आधारावरच गेली पावणे दोन वर्षे ‘साधना’ची वाटचाल सुरू आहे. आज हा विश्वास देणारे वडीलधारे नेतृत्वच पडद्याआड गेले. सा. रे. यांनी आत्मकथन लिहिलेले नाही; परंतु ते जे जगले, त्याला महत्त्व असल्याने ते कुठेतरी कागदावर आले पाहिजे यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरल्यावर काही आठवणी सांगायला ते तयार झाले. त्यानुसार पुण्यातील किशोर रक्तापे यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. त्यातून तयार झालेले पुस्तक लवकरच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार आहे.                                                                                                                                               - विश्वास पाटील