शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

चार दीक्षार्थींचे समस्त जैन बांधवांतर्फे स्वागत: रविवारी दीक्षाग्रहण उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 18:35 IST

‘फुलांची उधळण, ढोल-ताशा’अशा उत्साही वातावरणात चार दीक्षार्थींचे समस्त जैन बांधवांतर्फे सोमवारी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे शानदार स्वागत करण्यात आले. यानंतर रेल्वेस्थानकावरून चारचाकी, दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील विविध भागात ही रॅली जाऊन सायंकाळी हॉकी स्टेडियमजवळील शत्रुंजय सोसायटी येथे गेली. येथे या दीक्षार्थींचे स्वागत करण्यात आले. रॅलीत जैन समाजातील युवक, युवती, महिला यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.

ठळक मुद्देचार दीक्षार्थींचे समस्त जैन बांधवांतर्फे स्वागत: रविवारी दीक्षाग्रहण उत्सवसिद्धी भंद्रकर प्रवज्या समितीतर्फे आयोजन

कोल्हापूर : ‘फुलांची उधळण, ढोल-ताशा’अशा उत्साही वातावरणात चार दीक्षार्थींचे समस्त जैन बांधवांतर्फे सोमवारी येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे शानदार स्वागत करण्यात आले. यानंतर रेल्वेस्थानकावरून चारचाकी, दुचाकी रॅली काढण्यात आली. शहरातील विविध भागात ही रॅली जाऊन सायंकाळी हॉकी स्टेडियमजवळील शत्रुंजय सोसायटी येथे गेली. येथे या दीक्षार्थींचे स्वागत करण्यात आले. रॅलीत जैन समाजातील युवक, युवती, महिला यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.सुरत येथील ज्येष्ठ नागरिक नटवरभाई (वय ६९) व अहमदाबाद येथील वत्सलकुमार (२२) व त्यांची बहीण काव्याकुमारी (२०) व पुण्याची जीनलकुमारी (२०) हे चारजण जैन धर्माची दीक्षा रविवारी (दि. १०) ग्रहण करणार आहेत. सिद्धी-भंद्रकर प्रवज्या समितीतर्फे नॉर्थ स्टार रुग्णालय पाठीमागील भक्तिपूजानगर येथे हा दीक्षा ग्रहण उत्सव होणार आहे. दीक्षा ग्रहण रविवारी पहाटे ५.३० वा. होणार आहे.

समस्त जैन बांधवांनी चार दीक्षार्थींचे भव्य स्वागत कोल्हापूर शहरातून चारचाकी, दुचाकी रॅली काढून केले. रॅलीत युवक-युवती सहभागी झाल्या होत्या. (छाया : दीपक जाधव)कोल्हापूर-अहमदाबाद रेल्वेतून सोमवारी दुपारी तीन वाजून ४५ मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकावर या दीक्षार्थींचे आगमन झाले. यावेळी दीक्षार्थींची ओवाळणी करत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. यावेळी महापौर सरिता मोरे, परिवहन सभापती राहुल चव्हाण, नगरसेवक ईश्वर परमार, नगरसेविका पूजा नाईकनवरे, स्टेशन प्रबंधक ए. आय. फर्नांडिस, चंद्रकांत कालेकर, एस. व्ही. देशपांडे, ए. आर. हरेल, आदींनी त्यांचे स्वागत केले.या दीक्षार्थींना घेऊन जैन बांधवांनी व्हीनस कॉर्नर, दसरा चौक, बिंदू चौक, उमा टॉकिजमार्गे शत्रुंजय सोसायटीपर्यंत भव्य रॅली काढली. यावेळी दसरा चौकात मुस्लिम बोर्डिंगतर्फे दीक्षार्थींचे स्वागत करण्यात आले. अहमदाबाद जिल्ह्यातील धिओन येथील गुरुकुलच्या ८० विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे आणले होते. ते येथील दीक्षा ग्रहण उत्सवासाठी आले आहेत.

दीक्षा ग्रहण उत्सव बुधवारपासूनदीक्षा ग्रहण उत्सव बुधवारपासून सुरू होत आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन जैन बांधवांतर्फे करण्यात आले आहे. 

 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर