शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर प्रशासक नेमा, कोल्हापुरात चित्रपट व्यावसायिकांचा धर्मादायवर मोर्चा

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: December 22, 2023 19:24 IST

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात अनागोंदी कारभार सुरू असून येथील कामकाज सुधारण्यासाठी महामंडळावर प्रशासकाची नियुक्ती करा अशी ...

कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळात अनागोंदी कारभार सुरू असून येथील कामकाज सुधारण्यासाठी महामंडळावर प्रशासकाची नियुक्ती करा अशी मागणी करत शुक्रवारी चित्रपट व्यावसायिकांनी धर्मादाय सहआयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. महामंडळातील सावळा गोंधळ, हिशोबाचे घोळ, संचालकांमधील वितंडवाद, अध्यक्ष आणि संचालकांमध्ये नसलेला ताळमेळ, दोन अध्यक्ष, दोन निवडणुका, न्यायालयाची स्थगिती अशा अनेक घडामोडीनंतरही येथे अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यामुळे निकाल लागेपर्यंत प्रशासकांनी कामकाज पाहावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, इम्तियाज बारगीर,यांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अध्यक्ष, खजिनदार मनमानी कारभार करत शंकर भेंडेकर, निवडणूक अधिकारी यांना प्रत्येकी ५ लाख रुपये दिले. चार वर्षापूर्वी बंद झालेल्या सावंतवाडी शाखेतील ५० हजार रुपये महामंडळाकडे जमा नाही. कोरोना काळात रोखीने मदत केलेल्या रकमेचा हिशोब अहवालात दाखवलेला नाही, तीन वर्षांत सर्वसाधारण सभा नाही, कार्यकारिणीत खर्च, लेखापरीक्षण अहवालाला मंजूरी नाही. नवीन घटनेनुसार नवीन पदाधिकाऱ्यांना सह्यांच्या अधिकाराचे ठराव न करता बँक व्यवहार केले आहेत. मुंबई, कोल्हापूर, पुण्यातील जागांची धर्मादायकडे नोंद नाही. पाच सहा कोटींची गुंतवणूक करून त्यातून उत्पन्न नाही. सभासदांच्या या पैशाचा जाब विचारण्यासाठी धर्मादायशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करावे. यावेळी सुनिल मुसळे, विजय ढेरे, सागर टेळके, अरुण कांबळे यांच्यासह चित्रपट व्यावसायिक उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर