शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

सडोली खालसाचे वेगळेपण : दारू, जेवणावळींना फाटा देत पाडला वेगळा पायंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 1:20 PM

Grampanchyat Election Kolhapur- मतांसाठी पैशाचे वाटप नाही. दारू नाही की, मटणाच्या जेवणावळी. अशा सर्व गैरप्रकारांना फाटा देत यंदा सडोली खालसा (ता. करवीर) गावाने ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श पायंडा पाडला.

ठळक मुद्देदारू, जेवणावळींना फाटा देत पाडला वेगळा पायंडाआजी-माजी आमदारांच्या गावाचे पुढचे पाऊल

कोल्हापूर : मतांसाठी पैशाचे वाटप नाही. दारू नाही की, मटणाच्या जेवणावळी, अशा सर्व गैरप्रकारांना फाटा देत यंदा सडोली खालसा (ता. करवीर) गावाने ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श पायंडा पाडला.

आ. पी.एन. पाटील व माजी आ. संपतराव पवार यांचे हे गाव; परंतु या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गावाचे नाव बदनाम होऊ नये यासाठी चांगला पुढाकार घेतला. यावेळेच्या नाही; परंतु पुढील निवडणुकीत तरी अनेक गावांनी त्याचे अनुकरण केल्यास लोकशाही अधिक बळकट होईल.सडोली हे अत्यंत सधन-संपन्न गाव. बुलडोझर व्यावसायिकांचे गाव म्हणूनही त्याची ख्याती. चांगली जमीन, कष्टकरी शेतकरी यामुळे चांगले पीक व त्यामुळे समृद्धीने नटलेले हे गाव. त्यात काँग्रेस व शे.का. पक्षाचे स्थानिक राजकारणात बळकट गट. गावची लोकसंख्या सुमारे साडेसहा हजार. पाच प्रभागांत १३ जागा निवडून द्यायच्या होत्या.

त्यासाठी तीन पॅनलसह ४१ उमेदवार रिंगणात होते. अगोदरच काँग्रेस, शेकाप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न केले; परंतु जागा वाटपांत समझोता झाला नाही. त्यातही काँग्रेस व शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांचे निवडणूक बिनविरोध करण्याचे अखेरपर्यंत प्रयत्न होते; परंतु यश आले नाही. त्यामुळे निवडणूक लागलीच आहे तर अन्य कोणत्याही गोष्टींना थारा द्यायचा नाही, असे प्रमुख कार्यकर्त्यांनी ठरविले. त्यास गावातील स्वाभिमानी जनतेनेही मोलाची साथ दिली.

त्यामुळे एकूण निवडणुकीदरम्यान प्रचारातही गावात कुठेही तणाव नव्हता. कुणी कुणावरही दादागिरी, दहशत दाखविणे, असे प्रकार घडले नाहीत. एकही जेवणावळ उठली नाही किंवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी अन्य कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब झाला नाही. प्रचार करावा, ग्रामस्थांना आपली भूमिका पटवून द्यावी, त्यांनी मतदान करावे व जे निवडून येतील ते गावाचा कारभार पाहतील, असे सूत्र ठरल्याने यंदा गावची निवडणूक चांगल्या अर्थाने गाजली. पंचक्रोशीतूनही त्याबद्दल कौतुक झाले.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर