शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या सात बारावरून कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी मागितली लाच; तलाठ्यास इचलकरंजीत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 12:07 IST

इचलकरंजी : बँकेच्या कर्जाचा बोजा जमिनीच्या सात बारावरून कमी करून देण्यासाठी सात हजाराची लाच मागितल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्याने आलास- ...

इचलकरंजी : बँकेच्या कर्जाचा बोजा जमिनीच्या सात बारावरून कमी करून देण्यासाठी सात हजाराची लाच मागितल्याचे पडताळणीत स्पष्ट झाल्याने आलास- बुबनाळचा तलाठ्यासह इचलकरंजीत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. गजानन आप्पासो माळी (वय ४६, रा.शिवाजीनगर, इचलकरंजी) असे या तलाठ्याचे नाव आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. या कारवाईने महसूल क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दोनच दिवसांपूर्वी इचलकरंजी नगरपालिकेत दोघांना लाच घेतांना रंगेहात जेरबंद करण्यात आले होते.याबाबतची माहिती अशी, या प्रकरणातील तक्रारदार यांनी एक महिन्यापूर्वी पाच एकर सात बा-यावर नोंद केलेले जयसिंगपूर उदगाव बँकेच्या कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी योग्य कागदपत्रांसह आलास तलाठी कार्यालयात अर्ज दिला होता. त्यानंतर तक्रारदारांनी आपल्या मित्रास तलाठी माळी याला भेटण्यासाठी पाठवले. त्यावेळी माळी याने दहा हजार लाचेची मागणी केली. त्यामुळे संबंधित व्यक्तीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.

त्यानुसार पथकाने ३ नोव्हेंबर रोजी दोन पंचासमक्ष इचलकरंजीतील कॉंग्रेस भवनजवळ लाच मागणीची पडताळणी केली. त्यामध्ये तडजोडीअंती सात हजारांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. परंतु माळी याला कुणकुण लागल्याने त्याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. परंतु पडताळणीत मागणी स्पष्ट झाल्याने गुरुवारी तलाठी माळी याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीCrime Newsगुन्हेगारी