शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अक्षता माने यांना वाढदिवसाला मिळाली लसीकरणाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:46 IST

Corona vaccine Kolhapur- कोल्हापूर येथील कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयातील परिचारिका अक्षता विक्रम माने यांना वाढदिवसादिवशी लसीकरणाची भेट मिळाली. माने या सेवा रुग्णालय लसीकरण केंद्राच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात महापालिकेच्या पाच नागरी सुविधा केंद्रांमध्ये लसीकरण शिरोळ ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहिमेची सुरुवात

कोल्हापूर - येथील कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयातील परिचारिका अक्षता विक्रम माने यांना आज, शनिवारी वाढदिवसादिवशी लसीकरणाची भेट मिळाली. माने या सेवा रुग्णालय लसीकरण केंद्राच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या. कोल्हापूर शहरात महापालिकेच्या पाच नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी १० वाजल्यापासून लसीकरण करण्यात आले. महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज होती. येथील कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात लसीकरणानंतर लाभार्थी माने यांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्रमाणपत्र वितरण केले. यावेळी बावडा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उमेश कदम आदी उपस्थित होते.

महापालिकेच्या लसीकरणास आमदार चंद्रकांत जाधव, महानगरपालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, डॉ. अशोक पोळ, डॉ. अमोल माने यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, पंचगंगा हॉस्पिटल, महाडिक माळ, राजारामपुरी व सदर बाजार नागरी सुविधा केंद्र येथील लसीकरण केंद्रातील आरोग्य कर्मचारी यांना पहिल्या टप्प्यामध्ये  लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईनवरील महापालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.  डॉ. अमोल माने यांनी सांगितले कि, महापालिकेकडे लस ठेवण्यासाठी १२ शीतसाखळी केंद्रे आहेत. त्यापैकी एक मुख्य लसीकरण शीतसाखळी केंद्र सज्ज आहे. शिरोळ ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहिमेची सुरुवातसार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरोळ ग्रामीण रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली.  राजेश जाधव हे या केंद्रावर पहिले लाभार्थी ठरले. यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार अपर्णा मोरे, नगराध्यक्ष अमरसिंह माने माजी आमदार उल्हास पाटील आदी उपस्थित होते.लसीकरणानंतर सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी पुष्प देवून लाभार्थ्यांचा सत्कार केला.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर