शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदान शिबीरास आजरेकरांनी दिला चांगला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 20:09 IST

Lokmat Event Blood Donetion Kolhapur : लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला आजरेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तहसिल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबीरात "मी रक्तदान करणार आपणही करा " असा तरुणांनी संदेश देत आपलं नातं लोकमतशी घट्ट व जिव्हाळ्याचे असल्याचे दाखवून दिले.

ठळक मुद्दे आजऱ्यात ७५ रक्तदात्यांनी केले रक्तदान' मी रक्तदान करणार आपणही करा ' तरुणांनी दिला संदेश

सदाशिव मोरेआजरा :  लोकमतचे संस्थापक व स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला आजरेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. तहसिल कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या रक्तदान शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबीरात "मी रक्तदान करणार आपणही करा " असा तरुणांनी संदेश देत आपलं नातं लोकमतशी घट्ट व जिव्हाळ्याचे असल्याचे दाखवून दिले.रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ. संपत खिल्लारी, नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी,सभापती उदय पवार यांच्या हस्ते करण्यात आले. लोकमतचे आजरा तालुका प्रतिनिधी सदाशिव मोरे व वितरणचे उपसरव्यवस्थापक संजय पाटील यांनी रक्तदान शिबिरासाठी उपस्थित मान्यवर व रक्तदात्यांचे स्वागत केले.

शिबिर यशस्वी करणेसाठी तहसिलदार विकास अहिर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी भांगे, रवळनाथ केबल नेटवर्कचे रवींद्र नेवरेकर, भगवा रक्षक मंडळाचे वैभव सावंत, निवडणूक नायब तहसीलदार डी.डी. कोळी, गट विकास अधिकारी बी.डी.वाघ, मुख्याधिकारी अजिंक्य पाटील, आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.एन.सादळे, शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळाचे नाथा देसाई, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे व तालुकाध्यक्ष बंडोपंत चव्हाण, बैतूलमाल कमिटीचे अध्यक्ष मंजूर मुजावर, टीम सतेजचे नौशाद बुढ्ढेखान, नगरसेवक किरण कांबळे, आजरा सूतगिरणीचे सचिन सटाले,मनसेचे आनंदा घंटे यांनी विशेष सहकार्य केले.रक्तदान शिबीरास नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी उपनगराध्यक्ष बाळ केसरकर, महादेव पोवार,मायकेल फर्नांडिस, एस.पी.कांबळे, संभाजी इंजल, प्रकाश देसाई, सुनील शेवाळे, विलास रावजीचे, सचिन नांदवडेकर,मनीष टोपले, अजित हरेर, सुधीर कुंभार यासह मान्यवर उपस्थित होते. लोकमतचे वितरण अधिकारी भाऊसाहेब पाटील, अवधूत पोळ, संग्राम पायमल, धनाजी पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा आहे. रक्ताची गरज पाहून लोकमतने रक्तदान शिबीर घेऊन अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत केली आहे. लोकमतचे हे कार्य प्रेरणादायी आहे.- तहसिलदार,  विकास अहिर, आजरा.

लोकमतने घेतलेल्या रक्तदान शिबीरातून गरजू व्यक्तींना निश्चित मदत होणार आहे. रक्तदानामुळे मित्राच्या पत्नीचा जीव वाचविण्याचा अनुभव असल्याने आज मी रक्तदान केले व सर्वांना रक्तदान करण्यास प्रवृत्त केले.- किरण कांबळे, नगरसेवक

कोरोनाच्या भीषण संकटात अडचणीवर मात करीत आजरेकरांनी रक्तदान शिबीर यशस्वी केले. रक्तदानासाठी लोकमतने घेतलेला पुढाकार निश्चितच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.- बालाजी भांगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक

अभिजीतने ६५ वेळा केले रक्तदान..आजरा अर्बन बँकेत नोकरीस असलेले व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे अभिजीत केसरकर यांनी आज लोकमतच्या रक्तदान शिबिरात ६५ वे रक्तदान करून एक वेगळा उच्चांक केला आहे. त्यांचा नगराध्यक्षा जोत्स्ना चराटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटkolhapurकोल्हापूर