शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तळतळाट लागेल, कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला बाजूला ठेवलंय; अजित पवारांची कोपरखळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 17:18 IST

उपहासात्मक कळवळा दाखवत पवार यांनी फडणवीसांना काढला चिमटा

नागपूर/ कोल्हापूर : कोल्हापूरच्या ढाण्या वाघाला एक, दोन खाती देऊन बाजूला ठेवलंय, तळतळाट लागेल तुम्हांला अशी उपहासात्मक कोपरखळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंगळवारी अधिवेशनात लगावली.अधिवेशनात मंत्रिमंडळाचा विस्तार, महिलांना न मिळालेली संधी, अनेक खात्यांचा एकाच मंत्र्याकडे कार्यभार यावरून टोलेबाजी करताना उपहासाने का असेना उल्लेख करत पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्या दुखऱ्या नसीवरच बोट ठेवले. कारण मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी पाटील यांना दिल्लीवारी करावी लागली होती. मग त्यांचा समावेश करण्यात आला. परंतु त्यांना मनासारखं खातं दिलं नाही हे वास्तव आहे. पक्षातही त्याना बाजूला केल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे.या पार्श्वभूमीवर पवार म्हणाले, तुम्हा दोघांचं बरं चाललंय. मुख्यमंत्र्यांना विचारलं की ते म्हणतात फडणवीसांनी मला सांगितले म्हणून मी केले आणि फडणवीसांना काही विचारले की ते म्हणतात मुख्यमंत्र्यांची संमती आणा. दादा तुमची मला कधी कधी इतकी आठवण येते. तुमच्यासारखी व्यक्ती असती, तर अशी टोलवाटोलवी केली नसती. कोल्हापूरच्या या ढाण्या वाघाला केवळ एक, दोन साधी खाती, विभाग देऊन बाजूला ठेवलं आहे आणि स्वत: सहा सहा खाती घेतली आहेत. या पद्धतीचे राजकारण करता. अशाने तळतळाट लागेल तुम्हांला.पाटील यांनी गेल्या आठ वर्षांत पवार कुटुंबीयांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. परंतु त्यांच्याविषयी उपहासात्मक कळवळा दाखवत पवार यांनी फडणवीसांना चिमटा काढण्याची संधी सोडली नाही. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलAjit Pawarअजित पवारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन