शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: पंचवीस वर्षांपासून कोल्हापुरातील अजित दरेकर करतात दारात ध्वजवंदन

By संदीप आडनाईक | Updated: August 9, 2022 16:05 IST

अजित दरेकर यांचे स्वप्न यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साकारणार

संदीप आडनाईककोल्हापूर : स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी प्रत्येक नागरिक घराच्या दारात गुढीप्रमाणेच तिरंगा ध्वज उभारतील, असे कोल्हापूरच्या अजित दरेकर यांचे स्वप्न होते. त्यांचे हे स्वप्न यंदा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात साकारणार आहे. स्वत: दरेकर गेल्या पंचवीस वर्षांपासून घराच्या दारात तिरंग्याला अभिवादन करण्याची परंपरा जपतात. यासंदर्भातील 'माझा अभिमान' या ऐश्वर्य मालगावे यांनी प्रसारित केलेल्या व्हिडीओला प्रतिसाद मिळत असून यंदा तो जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 'हर घर तिरंगा' या मोहिमेंतर्गत व्हायरल होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार यंदा स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'हर घर तिरंगा' ही मोहीम देशभर राबविली जात आहे. मात्र वैयक्तिकपणे हीच मोहीम ४८ वर्षीय अजित दरेकर गत पंचवीस वर्षांपासून स्वत:च्या घरापासून राबवत आहेत. शिवाजी पेठेत संगणक शिकवणारे दरेकर यांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाला फक्त शासकीय कार्यालये, शाळा, कॉलेज, सार्वजनिक ठिकाणीच ध्वजवंदन का केले जाते, घरोघरी का होत नाही, असा प्रश्न पडायचा. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात जिल्हाधिकाऱ्यांनी घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले आणि ध्वजसंहितेचे पालन करत १९९७ पासूनच दरवर्षी निवृत्ती चौकातील कौलारू घराच्या दारात ध्वजारोहण करून तिरंग्याला अभिवादन करण्यास त्यांनी प्रारंभ केला.

'माझा अभिमान' व्हिडीओला प्रतिसादशाहूंसाठी ‘वंदन लोकराजाला, शंभर सेकंद कृतज्ञतेचे’ हा व्हिडीओ करणाऱ्या कल्पक संगीतकार ऐश्वर्य मालगावे यांनी कॅमेरामन हरीश कुलकर्णी, विक्रम पाटील, अमन सिन्हा, तसेच शेखर गुरव, देवयानी जोशी, वैष्णवी शानभाग, सचिन शानभाग यांच्या मदतीने गतवर्षी दरेकर यांच्या या कामगिरीचा 'माझा अभिमान' या नावे व्हिडीओ तयार केला आणि यूट्यूबवरून प्रसारित केला. त्याला प्रतिसाद मिळाला. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत यंदा नव्याने संपादित केलेला दरेकर यांचा हा व्हिडीओ 'हर घर तिरंगा' मोहिमेंतर्गत प्रसारित होत आहे.

गुढीपाडव्यादिवशी जसे असते, तसेच वातावरण या दिवशी माझ्या घरी असते. आई, वडील, पत्नी, मित्र या उत्सवात सहभागी होतात. शेजारच्या प्रा. मानसी दिवेकर याही प्रेरणादायी कथा सांगतात. दरवर्षी मी हे करतो, पण इव्हेंटचे स्वरूप येऊ दिले नाही. गुढीची काठीवर खादी भांडारमधून आणलेल्या तिरंग्याला उंच उभा करून अभिवादन करतो, राष्ट्रगीत स्वत:च गातो. त्यानंतर यथाशक्ती जिलेबी वाटतो. -अजित दरेकर,

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndependence Dayस्वातंत्र्य दिन