शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

चिल्लर पार्टीतर्फे रविवारी छोट्यांसाठी एअरबड चित्रपटाचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 13:09 IST

cinema Kolhapur- चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत रविवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी १० वाजता छोट्या मुलांसाठी एअरबड हा बालचित्रपट विनामूल्य दाखविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देचिल्लर पार्टीतर्फे रविवारी छोट्यांसाठी एअरबड चित्रपटाचे प्रदर्शन लॉकडाऊननंतर प्रथमच शाहू स्मारकमध्ये मुलांची एन्ट्री

कोल्हापूर : चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीमार्फत रविवार, दि. २८ फेब्रुवारी रोजी येथील शाहू स्मारक भवन येथे सकाळी १० वाजता छोट्या मुलांसाठी एअरबड हा बालचित्रपट विनामूल्य दाखविण्यात येणार आहे.कोरोनाच्या विषाणूमुळे प्रत्यक्ष चित्रपट दाखविण्यात येत नसल्यामुळे लॉकडाऊनमध्ये चिल्लर पार्टीतर्फे छोट्या मुलांसाठी ४७ चित्रपट ऑनलाइन पद्धतीने दाखविण्यात आले. दर महिन्याच्या चौथ्या रविवारी चित्रपट दाखविण्याच्या प्रथेप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातील चित्रपट येत्या रविवारी दाखविण्यात येणार आहे.

शासकीय नियमानुसार शारीरिक अंतर राखून, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करून हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. पालकांनी याची खबरदारी घेऊन हा चित्रपट पाहण्यासाठी मुलांना घेऊन यावे, असे आवाहन चिल्लर पार्टीतर्फे करण्यात आले आहे.बडी हा एका जोकरचा कुत्रा असतो. तो जोकरला छोट्या-छोट्या कार्यक्रमात मदत करत असतो. पण, जोकर बडीला चांगली वागणूक देत नसतो. एकदा अपघाताने बडीचा पिंजरा जोकरच्या गाडीतून खाली पडतो व बडीची सुटका होते. तो एका पडक्या घरामागे झाडीत लपून बसतो.

झाडीजवळच्या रिकाम्या जागेत ह्यजोशह्ण हा छोटा मुलगा बास्केटबॉलचा सराव करत असतो. कारण, त्याला शाळेच्या संघात घेतलेले नसते. इथे जोश व बडीची मैत्री होते. जोश बडीला घरी घेऊन येतो. पण, घरातील इतर लोक त्याला घरात घ्यायला तयार नसतात. काही दिवसांनी त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे त्याला घरात प्रवेश मिळतो.

बडीबरोबरच्या सरावामुळे जोशलाही शाळेच्या संघात प्रवेश मिळतो. बडीच्या खेळाचा गवगवा सर्वत्र होत असतो. बडीचा पत्ता समजल्यामुळे जोकर त्याला घेऊन जायला येतो. एका महत्त्वाच्या सामन्यात जोशच्या संघाला बडी आपल्या एअरजंपने सामना जिंकून देतो. बडी जोशजवळ राहतो की जोकर घेऊन जातो? हे पाहण्यासाठी आणि बडीची ही एअरजंप पहायला बालमित्रांना घेऊन या, असे आवाहन चिल्लर पार्टीतर्फे करण्यात आले आहे.

  • चित्रपट : एअरबड
  • वेळ : सकाळी १० वाजता
  • दिनांक : २८/०२/२०२१
  • स्थळ : शाहू स्मारक भवन, कोल्हापूर.
टॅग्स :cinemaसिनेमाkolhapurकोल्हापूर