शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

फसवणुकीची साखळी : शेती, पोल्ट्रीच्या नावावर नोंदणी, धंदा शेअर मार्केटचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 13:28 IST

विश्वास पाटील कोल्हापूर : दामदुप्पट परतावा देणारी कंपनी म्हणून सध्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करणाऱ्या एका कंपनीची नोंदणी शेती, फलोद्यान ...

विश्वास पाटीलकोल्हापूर : दामदुप्पट परतावा देणारी कंपनी म्हणून सध्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करणाऱ्या एका कंपनीची नोंदणी शेती, फलोद्यान व पोल्ट्रीला लागणारे साहित्य पुरवणी कंपनी म्हणून झाली आहे. त्या नावे कंपनीचा जीएसटी नंबर आहे. रिटेल, होलसेल बिझनेस असे कंपनी स्वत:च्या वेबसाईटवर म्हणते. मग त्यांनी शेतीतून असे कोणते उत्पादन घेतले की त्यातून ते लोकांना त्यांच्या गुंतवणुकीचा मोबदला दुप्पट देत आहेत याची विचारणा ज्यांनी त्यामध्ये पैसे गुंतवले आहेत त्यांनीच करण्याची गरज आहे.ज्या कंपनीची नोंदणीच कृषीपूरक व्यवहार करण्यासाठी झाली आहे, ती शेअर्समध्ये कशी गुंतवणूक करू शकेल, ते कायदेशीर आहे का याचा विचार गुंतवणूकदार करायला तयार नाही. किंबहुना आजच्या घडीला तो कशाचाच विचार करायला तयार नाही. अमक्याला एवढे लाख मिळाले, गाडी मिळाली मीच मागे राहिलोय असे वाटून तो स्वत: गुंतवणूक करण्यासाठी आणि इतरांना यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी रात्रीचा दिवस करत आहे. या कंपनीने शेवटचे रिटर्न्स जानेवारी २०२१ मध्ये भरले आहे. त्यानंतर आता दहा महिने झाले तरी त्यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. सहा महिने रिटर्न्स भरले नसल्यास नोंदणी रद्द होवू शकते असा कायदा आहे व प्रत्यक्षातही तसे घडते. कंपनीची नोंदणी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (एलएलपी) नुसार झाली आहे. ही कंपनी पैसे भरून घेतल्यावर तसे एक साधे पत्र गुंतवणूकदारास देते. त्यास कायदेशीर काहीच अर्थ नाही.

तेवढ्या एका प्रमाणपत्रावर लोक कोट्यवधी रुपये गुंतवत आहेत. त्यामुळे उद्या पैसे मिळेनात म्हणून तुम्ही कोणत्याही यंत्रणेकडे दाद मागायला गेला तरी तुम्हाला तेथून हाकलून देतील. कारण या प्रमाणपत्राला कायदेशीर पुरावा म्हणून शून्य किंमत आहे. तुमच्याकडून पार्टनर म्हणून रक्कम घेतली जात असेल तर कायद्याने पार्टनरशिप करार करणे बंधनकारक असते.बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल..ज्या लोकांनी विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांनी त्या कंपन्यांच्या व्यवहाराचे स्वरुप तपासावे. त्यातील पारदर्शकता जोखावी. तुमच्या कष्टाच्या लाख रुपयाचे दामदुप्पट करून देणारी कंपनी हे पैसे मिळवते कोठून हे तरी एकदा कंपनीच्या संचालकांना किंवा गुंतवणूक करा म्हणून आग्रह धरणाऱ्यास विचारले पाहिजे. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असा व्यवहार झाल्यास यातील बिंग बाहेर पडू शकेल..व्यापक सामाजिक हित- लोकमत गेली पाच दिवस वृत्तमालिकेच्या माध्यमातून या फसवणुकीचा भांडाफोड करत आहे, त्यामागे व्यापक सामाजिक हित आहे. कोणतरी सोम्या-गोम्या उठतो आणि तुम्हाला अमूक वर्षात एवढा फायदा करून देतो असे आश्वासन देतो आणि आपल्या समाजातील जे स्वत:ला सुशिक्षित समजतात असे शिक्षक, डॉक्टरपासून, सरकारी नोकरापर्यंत कोणतीही खातरजमा न करता कोट्यवधी रुपये गुंतवतात.-त्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे हे काम आहे. या कंपन्या कोण आहेत, ते कोण चालवतात त्यांच्याशी काही देणेघेणे नाही. जे गुंतवणूक करतात त्यांची फसवणूक होऊ नये, कुणाला तरी आयुष्यातून उठायला लागू नये यासाठीचा हा प्रयत्न आहे.कसबा वाळवेत पैसे मागण्यासाठी तगादादामदुप्पट योजनेत फसवणूक होऊ शकते हे लक्षात आल्यावर आता गुंतवणूकदार ज्यांच्याकडे पैसे गुंतविले होते, त्यांच्याकडे पैसे परत मागण्यासाठी तगादा लावत आहेत. राधानगरी तालुक्यातील एका व्यक्तीने वेल्थ मॅनेजमेंटच्या नावाखाली कंपनी स्थापन करून कसबा वाळवेतून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले. इतर कंपन्या दामदुप्पट देत असताना हा दामतिप्पट देतो अशी हमी देत होता. त्यामध्ये गुंतवणूक केलेल्या लोकांनी दोन दिवसांपूर्वी त्याला गावात बोलवून घेतले व मुद्दल परत करण्याची मागणी केली. त्यांनी ५० लाखांपर्यंतची रक्कम परत केली असल्याची माहिती स्थानिक लोकांनी शनिवारी दिली. तुमच्या गावांतील अमूक इतके कोटी रुपये गुंतवणूक झाली असल्याने सर्वांचे पैसे परत करतो, असेही त्यांनी सांगितले आहे.गावातील ग्रुपवर चर्चा‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या प्रत्येक गावाच्या ग्रुपवर शेअर होत आहेत. कष्टाला मरण नाही.. फसव्या योजनांना बळी पडू नका, असे प्रबोधन लोक करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीStock Marketशेअर बाजार