कोल्हापूर : श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी ( जि. नाशिक ) यांच्या वतीने उद्ममनगर कोठीतीर्थ येथे कृषी मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.
दर वर्षी दिंडोरी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते, मात्र यंदा कोरोनामुळे प. पु. गुरूमाउली व आबासाहेब माेरे यांच्या मार्गदर्शनाने गावाेगावी शेतीच्या बांधावर तसेच सेवा केंद्राच्या ठिकाणी कृषी जागर उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये शेतीशास्त्रासह विषमुक्त शेती कशी करावी, सेंद्रिय शेतीची उत्पादने यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हे शिबिर गुरुवार (दि. २८) पर्यंत चालणार आहे.
फोटो ओळी ; स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी यांच्या वतीने कोठीतीर्थ, उद्यमनगर येथे आयोजित कृषी मार्गदर्शन शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. (फोटो-२४०१२०२१-कोल-स्वामी)