शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

निपाणीत वरिष्ठ दिवाणी न्यायालयासाठी आंदोलन सुरूच

By admin | Updated: December 26, 2016 21:52 IST

बार असोसिएशनचे ५४ दिवसांपासून धरणे आंदोलन : मागणी मान्य झाल्याशिवाय माघार नाही

अभिजित सोकांडे -- निपाणी --केवळ न्यायाधीश उपलब्ध नसल्याच्या कारणावरून येथील वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरू करण्याच्या उद्देशातून बांधण्यात आलेल्या इमारतीचा मूळ उद्देशच बाजूला पडला आहे. त्यामुळे निपाणीत तातडीने वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरू झालेच पाहिजे, या मागणीसाठी निपाणी बार असो.ने धरणे आंदोलन छेडले आहे. मात्र ५४ दिवस उलटले तरी अद्याप आंदोलन सुरूच असून, संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. १९९४ साली निपाणीमध्ये अकोळ रोडवरील एपीएमसी इमारतीमध्ये कनिष्ठ न्यायालयाची स्थापना झाली. यासाठी तत्कालीन वकील संघटनेचे पदाधिकारी जी. जी. देशपांडे, जी. आर. कागवाडे, के. एम. कोणे, एस. आय. चौगुले, ए. डी. कट्टी, एम. एम. सवदी, पी. ए. तारळे, एम. व्ही. कुलकर्णी, एस. ए. पाटील, आर. बी. तावदारे, ए. एस. मुर्तुले, ए. एम. खवरे, एल. आर. अत्तार यांनी प्रयत्न केले. १९९४ साली एपीएमसीचे तत्कालीन चेअरमन डी. टी. पाटील यांच्या सहकार्याने कोर्टाला भाडेतत्त्वावर जागा देण्याचे पत्र मिळाले. त्यानंतरच बंगलोर हायकोर्टाने निपाणीत कोर्टासाठी परवानगी दिली. निपाणीत कनिष्ठ न्यायालय सुरू झाल्यानंतर निपाणी बार असो. नावाने संघटनेचे काम सुरू झाले. १९९४ पासून ते १३ आॅक्टोबर २०१३ पर्यंत निपाणीचे न्यायालय एपीएमसी आवारातच कार्यरत होते. २००१ च्या सुमारास न्यायालय स्वतंत्र इमारतीमध्ये असावे, यासाठी तत्कालीन निपाणी बार असो.चे अध्यक्ष आर. बी. तावदारे, निपाणी कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश जी. एस. रेवणकर यांनी पाठपुरावा सुरू केला. त्यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. जी. रमेश होते. त्यानुसार त्यावेळी मुरगूड रोडवरील कृषी केंद्र, इदगाह मैदान समोरची पालिकेची जागा, निपाणी वाड्यातील अंबिका कार्यालय, गांधी चौकातील जुनी ट्रेझरी बिल्डींग, आंबा मार्केट आणि सध्याची अक्कोळ क्रॉस जवळची जागा दाखविण्यात आल्या. त्यावेळी प्राधान्याने जिल्हा न्यायालय, हायकोर्ट न्यायालय यांनी आंबा मार्केटमधील जागा द्यावी, अशी मागणी निपाणी नगरपालिकेकडे केली. मात्र नगरपालिकेकडून जागा उपलब्ध न झाल्याने अखेर अक्कोळ क्रॉसजवळील कोल्हापूर ख्रिश्चन ट्रस्टच्या मालकीची आणि कुळांच्या ताब्यात असलेली अडीच एकर इतकी जागा पसंत करून संपादित करण्यासाठी पुढील कारवाई सुरू करण्यात आली. २००१ पासून सुरू झालेली ही प्रक्रिया २०१०ला पूर्ण होऊन ही जागा कब्जात घेतली. २०१० सालीच इमारतीचे बांधकाम सुरू झाले. तर ११ आॅक्टोबर २०१४ ला इमारतीचे उद्घाटन केले. (प्रतिनिधी)सध्या वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय चिकोडीत आहे. निपाणीतही वरिष्ठ दिवाणी न्यायालय सुरु करण्यासंदर्भात कर्नाटक सरकारने १४ फेब्रुवारी २०१४ ला परिपत्रक पास करून परवानगी दिली आहे. मात्र न्यायाधिशांची कमतरता असल्याने हे वरिष्ठ न्यायालय अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. यामुळे निपाणी बार असोसिएशनने ८ नोव्हेंबर २०१६ पासून बेमुदत संप चालू केलेला आहे. दररोज धरणे आंदोलन करण्यात येत आहे. ५४ दिवस झाले हे आंदोलन सुरु आहे. यामुळे येथील कामकाज ठप्प झाले आहे.