शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्मवीर अण्णांच्या गावातच शाळेच्या विकासासाठी आत्मक्लेष आंदोलन

By विश्वास पाटील | Updated: August 15, 2023 16:15 IST

...बेजबाबदार मुर्दाड राज्यकर्त्यांच्यामुळे निर्माण झालेली ही घटना कुंभोज ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत क्लेषदायक असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर : स्वत:च्या  पत्नीच्या मंगळसुत्रासह जे काहीं होतं ते विकल व जे काम सरकारला करणे शक्य नव्हत ते कर्मवीर अण्णांनी केल. मात्र सरकारने त्यांना आजही उपेक्षितच ठेवल आहे. ज्या कर्मवीर अण्णांनी सामाजिक जीवनातील शिक्षणाचे धडे कुंभोज (ता.हातकणंगले ) येथील प्राथमिक शाळेतून घेतले त्या शाळेचा समावेश महापुरूषांच्या शाळा विकास यादीमध्ये करण्याचे विसरून गेले. वारंवार निवेदने देवूनही याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने या यादीमध्ये या शाळेचा समावेश व्हावा याकरिता आज  कुंभोज या गावातील लोक स्वातंत्र्यदिनी कर्मवीर अण्णांच्या स्मारकाजवळ आत्मक्लेश उपोषणास बसले आहेत. बेजबाबदार मुर्दाड राज्यकर्त्यांच्यामुळे निर्माण झालेली ही घटना कुंभोज ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत क्लेषदायक असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.माजी खासदार शेट्टी म्हणाले, राज्यातील राज्यकर्त्यांना थोडी तरी लाज वाटायला पाहिजे होती. ज्या अण्णांनी हे वटवृक्ष  निर्माण केलं त्या वटवृक्षावर आपला  ताबा व वारसा हक्क दाखविण्यासाठी कर्मवीर अण्णांच्या विचाराचा वारसा सांगणा-या या राज्यकर्त्यांनी आपल्याच पै-पाहुणे व नातेवाईकाना  त्याठिकाणी विश्वस्त म्हणून बसविले आहेत. ते अशा वेळेस मुग गिळून गप्प का आहेत..? आज कोल्हापूरात ध्वजारोहणासाठी आलेले  उपमुख्यमंत्री तसेच वित्त व नियोजन मंत्री असलेले अजित पवार हे तर रयतच्या उभारणीत काडीचे योगदान नसतानाही ज्या कौशल्याने काकाच्या मदतीने मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य झाले आहेत त्यांनी त्याच कौशल्याने आपली तत्परता या कामात दाखवून कुंभोज ग्रामस्थांना आश्वस्त करून आत्मक्लेश आंदोलनापासून परावृत्त करणे गरजेचे होते. यामुळे राज्यात शिक्षणाची पाळंमुळं ज्या व्यक्तीने रुजवली, ज्या व्यक्तीने गरीबांच्या शिक्षणाची दारं खुलं केली त्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या गावातील  कुमार विद्या मंदिराचा विकास करण्याकडे दुर्लक्ष केल्यास जन आंदोलन उभे करून सरकारला याबाबत निर्णय घेण्यास भाग पाडू असा इशारा शेट्टी यांनी दिला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टीSchoolशाळा