शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यसेवा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 10:41 IST

cprhospital, kolhapurnews राजषीॅ छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सवोॅपचार रुग्णालय येथील कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गुरुवारी स्थगित करण्यात आले. नूतन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी आंदोलनाची दखल घेऊन कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच आवश्यक प्रक्रिया सुरू केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.

ठळक मुद्देआरोग्यसेवा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित नूतन अधिष्ठाता मोरे यांनी घेतली दखल

कोल्हापूर : राजषीॅ छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सवोॅपचार रुग्णालय येथील कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन गुरुवारी स्थगित करण्यात आले. नूतन अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी आंदोलनाची दखल घेऊन कार्यभार स्वीकारल्यानंतर लगेचच आवश्यक प्रक्रिया सुरू केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.गेली कित्येक वर्षे प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी बुधवारी (दि. १८) आणि गुरुवारी आंदोलन केले. नूतन प्रभारी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे हे कार्यभार स्वीकारण्यासाठी आले असता कार्यालयासमोर त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची प्रथम भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली. कार्यभार स्वीकारताच तत्काळ त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संस्था स्तरावरील प्रलंबित प्रशासकीय मागण्या व समस्या आहेत त्या तत्काळ मार्गी लावू, असे आश्वासित करून पदोन्नतीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी आदेश दिले. अर्जित व किरकोळ रजा मिळण्यासाठी आदेशही दिले.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तिवेतनासंबंधातील त्रुटी दूर करून अशा सर्व कर्मचाऱ्यांना तत्काळ सेवानिवृत्त वेतन लागू करू अशी ग्वाही दिली. याबाबत लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले, बाळासाहेब कवाळे, रघुनाथ कोटकर, कृष्णा नाईक, सरचिटणीस संजय क्षीरसागर, चरणदास घावरे, सुधीर आयरेकर, राजेश वालेकर, गणेश आसगावकर, विश्वास पाटील, महेश पाटील, शिवाजी निकम, शरद कामत यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयkolhapurकोल्हापूर