शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

Coronavirus Unlock : शिथिलता मिळाल्यानंतर कोल्हापूर पुन्हा गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 16:51 IST

सात दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर आणि काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने सोमवारी कोल्हापूर पुन्हा गजबजले. जिल्ह्यातील अनलॉकमधील या पहिल्या दिवशी रस्त्यांवरील बॅरिकेडस बाजूला जाऊन वाहनांची वर्दळ वाढल्याने सिग्नल सुरू झाले.

ठळक मुद्देशिथिलता मिळाल्यानंतर कोल्हापूर पुन्हा गजबजलेकोरोनाच्या भीतीमुळे अनेकजण अद्याप घरातच

कोल्हापूर : सात दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर आणि काही प्रमाणात शिथिलता मिळाल्याने सोमवारी कोल्हापूर पुन्हा गजबजले. जिल्ह्यातील अनलॉकमधील या पहिल्या दिवशी रस्त्यांवरील बॅरिकेडस बाजूला जाऊन वाहनांची वर्दळ वाढल्याने सिग्नल सुरू झाले.भाजी मंडई, पेट्रोल पंप, एटीएम, बँकांमध्ये गर्दी झाली. दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सिंग राखून व्यवहार सुरू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने भीती आणि एक दक्षता म्हणून अनेकजण अद्याप घरातच थांबून आहेत.कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने लागू केलेला सात दिवसांचा लॉकडाऊन रविवारी रात्री संपला. सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंत व्यवहार सुरू ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली. त्यानुसार कोल्हापूरकरांच्या सोमवारची सुरुवात झाली.

कपिलतीर्थ मार्केट, मिरजकर तिकटी, पंचगंगा नदी घाट परिसरात भाजी खरेदीला नागरिकांनी गर्दी केली. लक्ष्मीपुरी धान्य बाजारात तुरळक गर्दी राहिली. पेट्रोल पंपावर दुपारी दोन वाजेपर्यंत दुचाकीधारकांची गर्दी दिसून आली.

आठवड्याचा आणि अनलॉकचा पहिला दिवस असल्याने बँक, वीज बिल, मोबाईल बिल भरणे, आदी कामांसाठी नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढली होती.

बहुतांश ठिकाणचे सिग्नल सुरू झाले. काही एटीएममध्ये ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या. पावसाने दिलेली उघडीप आणि ऊन पडल्याने शहरातील वर्दळ वाढली. ती सायंकाळी दुकानांची वेळ संपेपर्यंत कायम राहिली. राज्य सरकारने जाहीर केलेला अनलॉकच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यावेळी शहरात नागरिकांची गर्दी उसळली होती. मात्र, कोल्हापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्तीने सात दिवसांचा लॉकडाऊन पाळला.

प्रशासनाकडून काही प्रमाणात शिथिलता मिळूनही शहरातील गर्दी गेल्या दोन महिन्यांच्या अनलॉकच्या पहिल्या दिवसापेक्षा कमी दिसून आली. 

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकkolhapurकोल्हापूर