शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

मतदानानंतर उमेदवारांच्या समर्थकांत संशयकल्लोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 22:50 IST

सांगली : संशयाचे भूत मानगुटीवर घेऊनच उमेदवारांनी हसतमुखाने मतदारांच्या भेटी घेत आभार दौरे सुरू केले आहेत. पक्षांतर्गत सर्वजण प्रामाणिकपणे ...

सांगली : संशयाचे भूत मानगुटीवर घेऊनच उमेदवारांनी हसतमुखाने मतदारांच्या भेटी घेत आभार दौरे सुरू केले आहेत. पक्षांतर्गत सर्वजण प्रामाणिकपणे प्रचार करीत असल्याचा भास निर्माण करून गढूळ वातावरण स्वच्छ करण्याचा प्रयत्नही झाला. आता मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे, गावोगावचे मतांचे अंदाज बांधताना, शंका-कुशंकांचे दळण दळले जात आहे. कोणी कोणाचे आणि कशासाठी काम केले, या प्रश्नांची उत्तरे शोधताना आगामी राजकीय व्यूहरचनाही बांधल्या जात आहेत.प्रचारापेक्षा यंदा भाजप व कॉँग्रेसमधील नेत्यांना पक्षांतर्गत बंडखोरांना थोपविण्यातच अधिक शक्ती खर्च करावी लागली. विरोधकांच्या ताकदीपेक्षा स्वकीयांच्या संशयास्पद भूमिकेची चिंता उमेदवारांना जास्त सतावून गेली. बंडखोर व छुप्या प्रचाराने वातावरण गढूळ होत असताना, प्रमुख उमेदवारांनी ‘आॅल इज वेल’चा भास निर्माण केला. गोंधळ दोन्हीकडे होता. दृश्य आणि अदृश्य स्वरूपाच्या राजकीय खेळ्यांनी उमेदवार हैराण झाले. समोर शत्रू असताना पक्षांतर्गत शत्रूंचीही चिंता त्यांना लागली होती. अखेर या सर्व राजकीय गोंधळात मतदान पार पडले. प्रचार सुरू झाल्यापासून मतदानापर्यंतच्या सर्व राजकीय घटनांचा आढावा आता घेतला जात आहे.भाजपने सुरुवातीला जिल्ह्यातील आमदारांची नाराजी दूर केली. त्यानंतर माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचेही संभाव्य बंडाचे वादळ शमविण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश मिळाले. कॉँग्रेसमध्ये पक्षांतर्गत वाद यंदा इतका विकोपाला गेला की, उमेदवारीवरून उघड संशय व्यक्त झाला. पक्षांतर्गत विरोधक एकमेकांसमोर येताना राष्टÑवादी नेत्यांबद्दलही शंका व्यक्त करण्यात आली. ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाणार म्हटल्यावर कॉँग्रेस कमिटीला कुलूप ठोकण्याचा प्रकारही घडला. अखेर ही जागा काँग्रेसच्या हातून गेली. तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उमेवार म्हणून काँग्रेस नेते विशाल पाटील यांनाच संधी दिली. पक्षांतर्गत वादावर माफीनामा व आपल्या राजकीय कौशल्याने विशाल पाटील यांनी पडदा टाकला. त्यामुळे सर्व काँग्रेस, राष्टÑवादी व घटकपक्षांचे नेते एकत्र आले. एकत्रितपणे प्रचारही पार पडला. दोन्ही पक्षात प्रचारावेळी ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे गीत गायिले गेले. मतदान प्रक्रिया पार पडली. निकाल अजून महिन्याने लागणार असल्याने प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्याचे काम उमेदवारांकडून सुरू आहे. अशावेळी त्यांच्या समर्थकांमध्ये संशयाचे वारे वाहू लागले आहे.संशयाचे वातावरण : का आहे?सांगली लोकसभा मतदारसंघात २0१४ मध्ये राष्टÑवादीची छुपी रसद भाजपला लाभली होती. यंदा राष्टÑवादीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेस उमेदवारासाठी धडपडत असताना दिसत होते. तरीही मागील अनुभवावरून, आता त्यांच्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे काँग्रेसमधीलच तालुकास्तरावरील विविध नेत्यांत यापूर्वी मतभेद होते. त्यामुळे त्यांच्या भूमिकेबद्दलही उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रत्येक तालुक्यातील मताधिक्याच्या गणितावर पुन्हा संशय खरा की खोटा, हे ठरविले जाणार आहे. भाजपमध्येही अशीच स्थिती आहे. आमदार व प्रमुख पदाधिकारी यापूर्वी नाराज होते. त्यांची नाराजी दूर झाली असली तरी, प्रत्यक्ष त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल उमेदवारांच्या समर्थकांत संशय आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर त्यावरून वाद रंगले आहेत.सामान्य नागरिकांतही रंगली चर्चाकोणता नेता कोणाचे काम करणार किंवा कोणाचे कार्यकर्ते कोणाच्या प्रचारात गुंतले होते, याची उघड चर्चा आता नागरिकांत रंगली आहे. राजकीय कार्यकर्त्यांसमोर या चर्चा पोहोचत असल्याने त्यांचा संशय बळावत आहे. निकाल लागेपर्यंत या संशयावरून कोणालाही धारेवर धरता येत नसल्याने, उमेदवारांचे समर्थक आता हृदयावर दगड ठेवून गप्प आहेत.