शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेवर मनसे नेते नाराज? म्हणाले, “त्यांनी आम्हाला दोनदा फसवलेय”
2
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी पदार्पणासह रचणार इतिहास; जाणून घ्या सविस्तर
3
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
4
"देशात धार्मिक युद्ध भडकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट जबाबदार"; मर्यादेबाहेर जाताय म्हणत भाजप खासदाराची टीका
5
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
6
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
7
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
9
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
10
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
11
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
12
IPL 2025: चेन्नई सुपर किंग्जमध्ये आला 'बेबी एबी'; अशी आहे टी२० कारकीर्द
13
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
14
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
15
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
16
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
17
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
18
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
19
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...

शिरोळ नगरपालिकेत सत्तांतर, फेरमतमोजणीतही निकाल कायम, अमरसिंह पाटील नगराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 15:24 IST

शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर शिरोळमध्ये सत्तांतर झाल्याचे स्पष्ट झाले. या पालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीचे वर्चस्व निर्माण झाले. या पालिकेत भाजप ७, शाहू आघाडी ९ आणि अपक्ष १ असे बलाबल झाल्याने राजर्षी शाहू आघाडीचे अमरसिंह पाटील ३३ मतांनी शिरोळचे नवे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले.

ठळक मुद्देशिरोळ नगरपालिकेत सत्तांतर, शाहू आघाडीचे अमरसिंह पाटील नूतन नगराध्यक्षकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेला ९ जागा, भाजपने जिंकल्या ७ जागा

शिरोळ : शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीत सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर शिरोळमध्ये सत्तांतर झाल्याचे स्पष्ट झाले. या पालिकेवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आघाडीचे वर्चस्व निर्माण झाले. या पालिकेत भाजप ७, शाहू आघाडी ९ आणि अपक्ष १ असे बलाबल झाल्याने राजर्षी शाहू आघाडीचे अमरसिंह पाटील ३३ मतांनी शिरोळचे नवे नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले.

शिरोळ नगरपालिका पंचवार्षिक निवडणूकीत भाजपाचा पराभव झाला. कॉंग्रेस, राष्‍ट्रवादी कॉंग्रेस व स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्‍या राजर्षी शाहू विकास आघाडीने सत्‍ता काबीज केली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमरसिंह माने-पाटील ३३ मतांनी विजयी झाले.

नगराध्यक्ष पदासह पाच नगरसेवक पदासाठी फेर मतमोजणी घेण्यात आली होती. मात्र सुरुवातीला झालेल्‍या मतमोजणीप्रमाणे निकाल कायम राहिला. शिरोळ पालिकेसाठी रविवारी चुरशीने ८0 टक्‍के मतदान झाले होते. सोमवारी निकाल जाहीर झाला. यामध्‍ये राजर्षी शाहू आघाडीला ९, भाजपाला ७ तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला. अपक्ष अरविंद माने हे भाजपचे बंडखोर उमेदवार आहेत. जिल्‍ह्यात शिरोळची निवडणूक लक्षवेधी ठरली होती. 

शिरोळ नगरपालिका निवडणुकीसाठी चुरशीने ८0  टक्के मतदान झाले़ २१७३१ मतदारांपैकी १७३६७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला़ एकूण नगरसेवक पदाच्या १७ जागेसाठी ८३ उमेदवारांचे, तर नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारांचे भवितव्य रविवारी मतदान यंत्रात बंद झाले होते.

आज, सोमवारी झालेल्या मतमोजणीनंतर शिरोळची सत्ता कुणाकडे हे स्पष्ट झाले आहे़ पालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने नगरसेवक पदापेक्षा नगराध्यक्ष पदाच्या निकालाकडे उत्सुकता लागून राहिली होती.गोकुळचे संचालक अनिल यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजप, खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व काँग्रेस पक्ष यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू आघाडी, आमदार उल्हास पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडी आणि प्रमोद लडगे यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीत चौरंगी लढत झाली.

अमर पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जंयत पाटील यांचे नातेवाईक व राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्या पत्नी सुध्दा जिल्हा परिषद सदस्य होत्या.शिरोळ नगरपालिका अंतिम निकाल

  1. नगराध्यक्ष : अमरसिंह पाटील
  2. शाहू आघाडी : ९
  3. भाजप : ७
  4. अपक्ष : १

शिरोळ नगरपालिका : विजयी उमेदवारप्रभाग  -१ : योगेश पुजारी ( शाहू आघाडी), विदुंला यादव ( भाजपा)प्रभाग -२ : अरविंद माने ( अपक्ष ), अनिता संकपाळ (भाजपा)प्रभाग -३ : कुमुदिनी कांबळे ( शाहू आघाडी), राजेंद्र माने ( शाहू आघाडी)प्रभाग -४ : सुनिता आरगे ( भाजपा), तातोबा पाटील (शाहू आघाडी)प्रभाग -५ : इमान अत्तार (भाजपा), कमलाकर शिंदे ( शाहू आघाडी)प्रभाग- ६ : दादासो कोळी (भाजपा), कविता भोसले (भाजपा)प्रभाग -७ : करूणा कांबळे (शाहू आघाडी), श्रीवर्धन माने देशमुख (भाजपा)प्रभाग -८ : सुरेखा पुजारी, जयश्री धर्माधिकारी, प्रकाश गावडे (शाहू आघाडी)पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, पाशा पटेल, शिवसेनेचे लक्ष्मण वडले या दिग्गजांच्या प्रचारातील सहभागामुळे निवडणुकीत रंगत आली होती.सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला, तेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी तैमुर मुल्लाणी, प्रशासक तथा तहसीलदार गजानन गुरव, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड हे मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात उपस्थित होते. आठ टेबलांवर मतमोजणी पार पडली.एकाचवेळी आठ प्रभागांतील मतमोजणी झाली. 

टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षkolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी