शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

मास्टर ब्लास्टर सचिन नंतर आशिष नेहराने घेतला बेळगावच्या चहाचा स्वाद, चाहत्यांचा सेल्फीसाठी गराडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 16:04 IST

अत्यंत साध्या वेषामध्ये असणाऱ्या नेहराला पहिल्यांदा ओळखता आले नाही. पण नंतर चाहत्यांचा गराडा वाढला

प्रकाश बेळगोजीबेळगाव: महिन्या दोन महिन्यापूर्वी मच्छे येथील एका कॅन्टीनमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चहाचा आस्वाद घेतला होता. यानंतर आता भारताचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांनी आज मंगळवारी सकाळी खानापूर शहरातील जांबोटी क्रॉस येथील एका हॉटेलमध्ये चहा आणि नाष्ट्याचा आस्वाद घेतला. यावेळी नेहरासोबत अनेक तरुणांनी सेल्फी घेत गराडा घातला.गोव्याहून बेळगावकडे जात असताना सकाळच्या सुमारास कारमधून आशिष नेहरा आणि त्यांचे सहकारी खानापुरात दाखल झाले होते. प्रारंभी याची कोणाला कल्पना आली नाही, मात्र थोड्याच वेळात काहीच्या लक्षात येतात अत्यंत साध्या पेहरावात असणाऱ्या नेहरा यांच्यासोबत अनेक तरुणांनी सेल्फी घेत गराडा घातला. यावेळी 'मित्रांनो नाश्ता करू द्या, सगळ्यांशी बोलतो आणि सेल्फीही देतो', असे म्हणत नेहराने चाहत्यांना निराश केले नाही.कांही दिवसापूर्वी वैजू निट्टूरकर या नागुर्डा (ता. खानापूर) येथील युवकाच्या मच्छे, बेळगाव येथील चहाच्या दुकानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी चहाचा आस्वाद घेतला होता. तो प्रसंग त्यांनी सोशल मीडियावरही शेअर केला होता. त्यानंतर आज आणखी एका स्टार क्रिकेटने खानापूरला भेट दिली. या पद्धतीने दोन महिन्यांच्या कालावधीत भारताच्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंना पाहण्याची व भेटण्याची संधी स्थानिक तरुणांनी अनुभवली. नुकताच बेळगावात झालेल्या आमदार अनिल बेनके आयोजित ऑल इंडिया लेवल टेनिस क्रिकेट स्पर्धेत देशातील प्रत्येक राज्यातून दिग्गज खेळाडू बेळगावला आले होते आणि बेळगावचे वातावरण क्रिकेटमध्ये बनलं होतं त्यातच नेहरा यांची भेट देखील क्रिकेटर रसिकांना चर्चेचा विषय ठरली आहे.दरम्यान, भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा यांनी खानापूरला भेट दिल्याने परिसरात हा कौतुकाचा विषय ठरला आहे. हॉटेलचे मालक महंमद नंदगडी हे स्वतः क्रिकेटचे मोठे चाहते असल्यामुळे त्यांनी आजचा दिवस संस्मरणीय असल्याचे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकAshish Nehraआशिष नेहरा