शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Kalamba Jail: गांजा, मोबाइलनंतर आता पिस्तुलांचे आव्हान; गुन्हेगारांच्या टोळ्या आतही सक्रीय

By उद्धव गोडसे | Updated: November 6, 2025 17:55 IST

सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

उद्धव गोडसेकोल्हापूर : कळंबा कारागृहात सातत्याने गांजा आणि मोबाइल सापडत असल्याने आतील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आलीच होती. आता कारागृहातील शौचालयात पिस्तुलाचे जिवंत काडतूस सापडल्याने कारागृह प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. कुख्यात गुन्हेगारांच्या टोळ्या आतही सक्रीय असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांना रोखण्याचे आव्हान अधिकाऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. अन्यथा लवकरच कारागृहात टोळीयुद्ध भडकण्याचे संकेत काडतुसाच्या घटनेतून मिळत आहेत.राज्यातील प्रमुख कारागृहांपैकी एक असलेले कळंबा कारागृह अलीकडे गैरप्रकारांमुळे चर्चेत आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात अधिकाऱ्यांच्या विशेष शोधमोहिमेत या कारागृहात ८० मोबाइल आणि काही सीमकार्ड सापडले होते. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात ४६ मोबाइल सापडले. चार-दोन मोबाइल सापडण्याचे प्रकार नेहमीच सुरू असतात. यावरून कारागृहात कैद्यांकडून मोबाइलचा वापर होत असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे मोबाइल शोधून काढणाऱ्या कारागृह प्रशासनाला मोबाइलचा वापर करणारा एकही कैदी सापडला नाही. सीमडकार्डवरून फोन करणाऱ्या व्यक्तींचा थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे पुढे तपासाचे काय झाले हे कारागृहातील अधिकारी आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाच माहिती आहे.कारागृहातील कैद्यांकडून गांजाचा वापर सर्रास सुरू असतो. यात कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार घडला आहे. कैद्यांना गांजा पुरवणारा सुुभेदार बाळासाहेब गेंड याला अटक झाली होती. त्याच्या घरझडतीत सव्वादोन किलो गांजा सापडला होता. गांजा आणि मोबाइल पुरवण्याचे गैरप्रकार उघडकीस आल्याने चार अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या, तर ११ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली होती. तरीही, कळंबा कारागृहाचा कारभार सुधारलेला दिसत नाही.जेलचा कारभार कैद्यांच्या हातीकळंबा कारागृहात पुण्यातील गजा मारणे, आंदेकर यासह अनेक कुख्यात गुंडांच्या टोळ्यांमधील गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत. मोक्का, अमली पदार्थांची तस्करी, खून, अपहरण, खंडणी वसुली अशा गंभीर गुन्ह्यांतील गुन्हेगारांची आत प्रचंड दहशत आहे. आतही कैद्यांच्या टोळ्या तयार झाल्या असून, त्यांच्याकडून इतर कैद्यांची पिळवणूक होते. गेल्या वर्षभरात झालेल्या हल्ल्यांमध्ये दोन कैद्यांचा मृत्यू झाला. एके रात्री अंधारात कैद्यांच्या दोन गटात उडालेल्या धुमश्चक्रीत तुफान दगडफेक झाली होती. त्यात एक कैदी गंभीर जखमी झाला होता.

गंभीर घटनांचे संकेतकारागृहात जिवंत काडतूस सापडले याचा अर्थ पिस्तूल आधीच पोहोचले असेल किंवा यायचे असेल. हा प्रकार वेळीच लक्षात आला नसता, तर कदाचित येणाऱ्या काही दिवसांत कारागृहात एखाद्या कैद्याचा खून झाला असता. पिस्तूल नाही मिळाले, तरी कैद्यांकडून काहीतरी अघटित घडू शकते, याचे संकेत या घटनेतून मिळाले आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

कळंबा कारागृहात मोबाइल आणि गांजानंतर आता जिवंत काडतूस सापडणे गंभीर आहे. अशा वस्तू आत जातातच कशा याचे आश्चर्य वाटते. काडतुसामुळे पिस्तुल आत आसल्याची शंका येणे स्वाभाविक आहे. त्यादृष्टीने तपास सुरू आहे. - संजीव झाडे - पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा पोलिस ठाणे 

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Jail faces pistol challenge amidst ongoing contraband issues.

Web Summary : Kolhapur jail's security is questioned after a live cartridge was found. Gang activity persists inside, despite previous seizures of drugs and phones, signaling potential violence.