शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सव होणार निर्बंधमुक्त, अंबाबाईच्या मंदिरात ई-पासची गरज नाही

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: September 10, 2022 12:12 IST

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील एक देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा यंदाचा नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त होणार आहे.

कोल्हापूर :

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील एक देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा यंदाचा नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त होणार आहे. कोरोनाच्या पूर्वी ज्या पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा केला जात होता तसाच यंदाचादेखील असणार आहे. ई-पासची सक्ती असणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.आता नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. बरोबर १५ दिवसांनी अंबाबाईचा नवरात्रोत्सव सुरू होत असून, या काळात दरवर्षी २५ लाखांवर भाविक देवीचे दर्शन घेतात. मात्र गेली दोन वर्षे कोरोनामुळे मंदिर भाविकांसाठी बंद होते. फक्त पुजारी आणि देवस्थानच्या वतीने देवीचे सर्व धार्मिक विधी पार पाडण्यात आले. गेल्या वर्षी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळे जिल्हा प्रशासनाने भाविकांना ई-पासची सक्ती केली होती. त्यामुळे अनेक भाविकांना देवीच्या प्रत्यक्ष दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. यंदा मात्र कोरोना हद्दपार झाल्याने गणेशोत्सवाप्रमाणेच अंबाबाईचा नवरात्रोत्सवदेखील निर्बंधमुक्त साजरा होणार आहे. याबाबतजिल्हाधिकारी रेखावार म्हणाले, कोरोनाच्या पूर्वी ज्याप्रमाणे नवरात्रोत्सव साजरा होत होता, त्याचप्रमाणे यंदादेखील होईल. ई-पास असणार नाही. भाविकांसाठी दर्शन मंडप, पार्किंग सुविधा, स्वच्छतागृह अशा प्राथमिक सोयीसुविधा निर्माण केल्या जातील. सध्या देवस्थान समितीकडून नवरात्रोत्सवाची प्राथमिक तयारी सुरू झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर