शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सासूच्या निधनानंतर सुनेची आत्महत्या, घराच्या टेरेसवरुन घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 11:16 IST

सासुच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेने राहत्या घराच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सानेगुरुजी रोडवरील आपटेनगर येथे घडली. मृत सुन शुभांगी संदीप लोखंडे (वय ३९) तर सासू मालती मधुकर लोखंडे (७०) अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

ठळक मुद्देसासूच्या निधनानंतर सुनेची आत्महत्याघराच्या टेरेसवरुन घेतली उडी सानेगुरुजी-आपटेनगर येथील घटना

कोल्हापूर : सासुच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने सुनेने राहत्या घराच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सानेगुरुजी रोडवरील आपटेनगर येथे घडली. मृत सुन शुभांगी संदीप लोखंडे (वय ३९) तर सासू मालती मधुकर लोखंडे (७०) अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मधुकर लोखंडे हे मुळचे बागणी (ता. बागणी, ता. वाळवा, जि. सांगलीचे) ते व पत्नी मालती दोघेही शिक्षक असल्याने पन्नास वर्षापासून कोल्हापूरात आपटेनगर येथे राहतात. सानेगुरुजी रोड आपटेनगर चौकात त्यांचा रस्त्याला लागुनच तिन मजली बंगला आहे.

दोघेही सेवानिवृत्त आहेत. त्यांचा मुलगा संदीप लोखंडे हा खासगी वाहनावर चालकाचे काम करतो. सुन शुभांगी गृहीणी होती. या दोघांना शिवतेज (१६) नावाचा एकुलता मुलगा आहे. तो सध्या दहावी परिक्षा देतो.

मालती लोखंडे आजाराने अंथरुणाला खिळून होत्या. त्यांची देखभाल सुन शुभांगी करीत होती. गेल्या चार दिवसापासून त्यांची प्रकृत्ती खालावली होती. शनिवारी पहाटे मालती यांची प्रकृत्ती अत्यवस्थ होवून त्यांचे निधन झाले. हा धक्का सुन शुभांगी यांना सहन झाला नाही. त्या धावत तिसऱ्या मजल्यावर असलेल्या देवघरात गेल्या. येथील अंगारा घेवून सुनेने राहत्या घराच्या टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या केली.

दरम्यान या प्रकाराची माहिती जुनाराजवाडा पोलीसांना दिली. पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा करुन शुभांगीचा मृतदेह शववाहिकेतून सीपीआरला पाठविला आहे.

 

टॅग्स :Accidentअपघातkolhapurकोल्हापूर