शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
3
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
4
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
5
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
6
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
7
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
8
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
9
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

अखेर केएमटी बस खरेदी निविदा मंजूर

By admin | Updated: August 13, 2014 00:56 IST

परिवहन समिती सदस्यांचे राजीनामे : नाहक बदनामी झाल्याने सदस्य त्रस्त : वसंत कोगेकर

औरंगाबाद : मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांची एंट्री...त्यांच्या भोवती शेकडो तरुण-तरुणींचा गराडा ...त्यांची एक छबी टिपण्यासाठी फ्लॅश मारत सर्वांचे मोबाईल आणि कॅमेरे उंचावतात...चाहत्यांच्या उत्साहाला कलावंतांनी हात उंचावून प्रतिसाद दिला आणि उपस्थित सर्वांची मने जिंकली. निमित्त होते ‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे आयोजित ‘रेगे’ या मराठी चित्रपटाच्या प्रमोशनचे. यावेळी अभिनेता महेश मांजरेकर, संतोष जुवेकर आणि लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्याबरोबर तरुणाईने दिलखुलास संवाद साधला.‘लोकमत युवा नेक्स्ट’तर्फे सोमवारी युवा नेक्स्टच्या सदस्य आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ‘रेगे’ चित्रपटातील कलावंतांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी मिळवून देण्यात आली. देवगिरी इंजिनिअरिंग महाविद्यालय आणि जेएनईसी महाविद्यालय येथे हा कार्यक्रम झाला.देवगिरी इंजिनिअरिंग महाविद्यालय आणि जेएनईसी महाविद्यालयात अभिनेता महेश मांजरेकर, संतोष जुवेकर, दिग्दर्शक अभिजित पानसे यांचे आगमन झाले. यावेळी त्यांना पाहण्यासाठी व त्यांची छबी मोबाईलमध्ये टिपण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली. ‘रेगे’ चित्रपटाच्या टीमचे या दोन्ही ठिकाणी जंगी स्वागत झाले. देवगिरी इंजिनिअरिंग महाविद्यालयात संचालक डॉ. उल्हास शिऊरकर यांनी सर्वांचे स्वागत केले. तसेच एमजीएम येथे जेएनईसीचे उपप्राचार्य डॉ. हरीरंग शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. देवगिरी इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या सभागृहात तसेच एमजीएम येथील रुक्मिणी सभागृहात महेश मांजरेकर, संतोष जुवेकर, अभिजित पानसे यांनी विद्यार्थ्यांथी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात अभिनेता संतोष जुवेकर यांनी विद्यार्थ्यांच्या गर्दीबरोबर स्वत:चे छायाचित्र म्हणजेच सेल्फीज् येईल, अशा पद्धतीने आपल्या मोबाईलमध्ये छबी टिपली, तर रुक्मिणी सभागृहात ‘मोरया’ चित्रपटातील संवादाचे सादरीकरण करू न उपस्थितांची मने जिंकली.खऱ्या घटनेवर आधारित वास्तववादी चित्रपट बनवताना त्यात खरेपणा यावा, यासाठी ‘रेगे’मध्ये व्यक्तिरेखांची नावेही खरीच वापरली आहेत. तरुणाईने महविद्यालयीन दिवसांचा आनंद घ्यावा; मात्र त्याबरोबर आई-वडिलांच्या अपेक्षाही पूर्ण कराव्यात. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडता कामा नये. आयुष्यात जे काही करायचे आहे, त्यावर लक्ष केंद्रित के ले पाहिजे, असे दिग्दर्शक अभिजित पानसे यावेळी म्हणाले.पालक ांचा आदरकोणत्याही चित्रपटातील एखादे कॅरेक्टर शिकवण देत नसते, तर संपूर्ण चित्रपटातून काही ना काही शिकवण दिली जाते. तरुणाईने आपल्या पालकांचा आदर होईल, असे काम केले पाहिजे. चुकीचे विचार मनात येत असतील तर बदलले पाहिजेत. ‘रेगे’ चित्रपटातून चुकीचे विचार बदलण्यास मदत होईल, असे अभिनेता संतोष जुवेकर म्हणाले.सखी मंच सदस्यांसाठी खास शोलोकमत सखी मंच सदस्यांसाठी प्रोझोन मॉलमधील सत्यम सिनेप्लेक्स येथे‘रेगे’ चित्रपटाच्या खास ‘शो’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेता महेश मांजरेकर, संतोष जुवेकर आणि दिग्दर्शक अभिजित पानसे यांचे प्रोझोन मॉलचे अध्यक्ष अनिल इरावणे यांनी स्वागत केले. महेश मांजरेकर, संतोष जुवेकर आणि अभिजित पानसे यांनी यावेळी संवाद साधला. राज्यात पहिल्यांदा प्रदर्शनाच्या तारखेआधी ‘रेगे’ चित्रपटाचा शो औरंगाबादेत सोमवारी झाला.तरुणाई स्मार्ट४आजची तरुणाई ही स्मार्ट आहे. संगणकाच्या एका क्लिकवर पाहिजे ती माहिती मिळविली जाते; परंतु त्याचा योग्य वापर व्हायला पाहिजे. पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष न दिल्यास काय परिणाम होतो, ही गोष्ट ‘रेगे’ चित्रपटातून दाखविण्यात आली आहे. वडील आणि मुलाचे नाते आज फ्रेंडली आहे. आधी असे नव्हते. मुले काय करतात याकडे पालकांचे लक्ष हवे, असे यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अभिनेता महेश मांजरेकर म्हणाले. १५ आॅगस्टला प्रदर्शित४‘रेगे’ चित्रपटातून मुलांच्या भावनांचा आणखी एख पैलू सादर करण्यात येणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, साऊथ आफ्रिका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, गोवा मराठी चित्रपट महोत्सव या प्रतिष्ठेच्या महोत्सवांमध्ये प्रेक्षकांच्या कौतुकास प्राप्त ठरलेला ‘रेगे’ १५ आॅगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटातील भूमिका आणि चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचा आग्रह ‘रेगे’चित्रपटाच्या टीमने केला.