शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
5
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
6
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
7
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
8
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
9
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
10
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
11
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
12
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
13
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
14
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
15
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
16
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
17
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
18
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
19
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
20
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा

गडहिंग्लजमध्ये ‘आयलीग’ ‘आयएसएल’ही खेळणार--राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:52 AM

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत इंडियन लीग (आय लीग) व इंडियन सुपर लीग(आयएसएल) या देशातील अव्वल स्पर्धा खेळणारे मातब्बर संघांनीही नावनोंदणी केली आहे

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडू झळकणार उद्या प्रारंभ, मातब्बर संघांची नावनोंदणी प्रतिभावान खेळाडूंची खाण समजला जाणारा गोव्याचा सेसा अकादमी संघही तुल्यबळ आहे.

गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज फुटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत इंडियन लीग (आय लीग) व इंडियन सुपर लीग(आयएसएल) या देशातील अव्वल स्पर्धा खेळणारे मातब्बर संघांनीही नावनोंदणी केली आहे. यामध्ये केरळ एफ.सी., चेन्नई एजीएस्, पुणे सिटी एफसी, गोवा सेसा अ‍ॅकॅडमी, बंगलूर डीवायएस या संघांचा समावेश आहे. त्यामुळे या संघांतील आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय खेळाडू एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर उतरतील. उद्या, शुक्रवारपासून सुरू होणाºया स्पर्धेसाठी तब्बल दोन लाखांची बक्षिसे असून, स्पर्धेचे यंदाचे तेरावे वर्षे आहे.

गडहिंग्लजकरांच्या फुटबॉलप्रेमाला दाद देण्यासाठी देशातील अनेक मातब्बर संघांनी आवर्जून सहभाग घेतला आहे. आपल्या व्यावसायिक अटी बाजूला सारून सोयी-सुविधांचा लहान शहरात अभाव असतानाही भारतीय फुटबॉलमधील सर्वोच्च मानल्या जाणाºया आयलीग संघांनीही दरवर्षी सहभाग नोंदविला आहे.

द्वितीय श्रेणी आयलीग खेळणारा केरळ एफसी प्रशिक्षक पुरुषोत्तम यांच्या मार्गदर्शनाखाली दोन परदेशी खेळाडंूसह स्पर्धेत उतरला आहे. अखिल भारतीय अकाऊंट आॅफ जनरल स्पर्धा विजेता तमिळनाडूतील चेन्नई एजीएसही यंदा नशीब आजमावतो आहे. गडहिंग्लजचा संतोष ट्रॉफी खेळाडू विक्रम पाटील चेन्नईतून खेळेल.

देशातील सर्वाधिक जुनी मानली जाणारी सव्वाशे वर्षांची परंपरा असणाºया आयएफए शिल्ड स्पर्धा विजेता पुणे सीटी एफसी (युवा) हा आयएसएलचा संघही स्पर्धेचे आकर्षण आहे. बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप (बीईजी) हा पुणे आर्मी संघही तगडा आहे. प्रतिभावान खेळाडूंची खाण समजला जाणारा गोव्याचा सेसा अकादमी संघही तुल्यबळ आहे.

बंगलोरचा डीवायएसएस, हुबळी एफसी, कोल्हापूरचा प्रॅक्टीस् क्लब, चेतना पुसद, सोलापूर एसएसएसआय, बेळगाव, मिरज संघ सहभागी होत आहेत. स्थानिक यजमान उपविजेता गडहिंग्लज युनायटेड, मास्टर स्पोटर्सही कशी कामगिरी करतात याकडे फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.यापूर्वीचे मानकरीस्पोर्टिंग गोवा, एसबीटी केरळ, पुणे एफसी, एचएएल बंगलोर, ओएनजीसी मुंबई, डीएसके शिवाजीयन्स्, साऊथ युनायटेड आणि बीईएमएल बंगलूर हे या स्पर्धेचे यापूर्वीचे मानकरी आहेत.

टॅग्स :Sportsक्रीडाFootballफुटबॉल