शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

ॲड. गुलाबराव घोरपडे यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 11:41 IST

आज, शनिवारी दुपारी तीन वाजता कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲड. गुलाबराव रघुनाथराव घोरपडे यांची शुक्रवारी रात्री दहा वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. निधनसमयी ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचा सच्चा, एकनिष्ठ आणि पक्षनेतृत्वावर निस्मीम भक्ती असणारा कार्यकर्ता हरपला, अशा शब्दात त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली वाहिली.ॲड. गुलाबराव घोरपडे यांना गेल्या दोन दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे शिवाजी पार्क येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री दहा वाजता त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच माजी मंत्री सतेज पाटील, शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण, महाराष्ट्र सहकारी बँकेचे माजी संचालक बाळासाहेब सरनाईक यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते रुग्णालयात पोहचले.गुलाबराव घोरपडे हे मूळचे कागल तालुक्यातील माद्याळ येथील सरकार घरण्यातील होते. कोल्हापूरला शिक्षणासाठी आले, पुढे ते वकील झाले. त्यांचा पिंड कार्यकर्त्याचा असल्याने ते काँग्रेस पक्षात सक्रिय झाले. १९७८ पासून ते सर्वसामान्य सक्रिय कार्यकर्ता म्हणून कार्य करू लागले. पक्षाची ध्येयधोरणे ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यात त्यांचा पुढाकार राहिला. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे ते निकटवर्तीय होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ते सलग २० वर्षे सरचिटणीस होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे ते दहा वर्षे अध्यक्ष राहिले. दहा वर्षे अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीवर सदस्य म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्यावर त्यांची प्रचंड श्रद्धा होती. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसह राज्यात विविध आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला. काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी त्यांचे घनिष्ट संबंध राहिले.

आज दुपारी कोल्हापुरात अंत्यसंस्कारआज, शनिवारी दुपारी तीन वाजता कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, तत्पूर्वी नागाळा पार्क, महावीर कॉलेजच्या मागे असलेल्या त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर