शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
4
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
5
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
6
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
7
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
8
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
9
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
10
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
11
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
12
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
13
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
14
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
15
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
16
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
17
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
18
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
19
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
20
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा

कला महाविद्यालयांचे प्रवेश फुल्ल, वेटिंग लिस्ट वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 16:31 IST

चित्रकला व शिल्पकलेच्या माध्यमातून वाढत्या करिअर संधींचा परिणाम म्हणून कोल्हापुरातील तीनही कला महाविद्यालयांमध्ये प्रवेश फुल्ल झाले आहेत. मान्यता असलेल्या विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत दुपटीने प्रवेश अर्ज आल्याने कला महाविद्यालयांनी शासनाकडे ही संख्या वाढवून देण्याची मागणी केली आहे.

ठळक मुद्देकला महाविद्यालयांचे प्रवेश फुल्लवेटिंग लिस्ट वाढली : क्षमता वाढविण्याची मागणी

कोल्हापूर : चित्रकला व शिल्पकलेच्या माध्यमातून वाढत्या करिअर संधींचा परिणाम म्हणून कोल्हापुरातील तीनही कलामहाविद्यालयांमध्ये प्रवेश फुल्ल झाले आहेत. मान्यता असलेल्या विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत दुपटीने प्रवेश अर्ज आल्याने कला महाविद्यालयांनी शासनाकडे ही संख्या वाढवून देण्याची मागणी केली आहे.एकेकाळी दुर्लक्षित असलेल्या चित्रकला, शिल्पकलेच्या क्षेत्रात गेल्या पाच वर्षांत आमूलाग्र बदल झाला आहे. या कलेच्या माध्यमातून अ‍ॅनिमेशन, डिझायनिंग, आर्किटेक्ट, डिजिटायझेशन अशा विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या कलांचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. ‘काही येत नाही तर चित्रकलेकडे जा,’ ही मानसिकता बदलून आता अगदी ९७ व ९३ टक्के गुण मिळालेले विद्यार्थीदेखील कला महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेत आहेत.कोल्हापूर शहरात दळवीज आर्टस इन्स्टिट्यूट, रा. शि. गोसावी कलानिकेतन महाविद्यालय व कलामंदिर ही तीन कला महाविद्यालये कार्यरत आहेत. या तीनही कला महाविद्यालयांमध्ये फौंडेशन, अप्लाइड आर्टच्या वर्गासाठी १०० हून अधिक अर्ज आले आहेत. या वर्गाची प्रवेश क्षमता ३० आहे. मेरिट आणि आरक्षणानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.दरवर्षी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. मात्र शासनमान्यतेच्या नियमानुसार विद्यार्थिसंख्येवर मर्यादा असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशच मिळत नाही. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा वेटिंग लिस्टवर असलेल्या विद्यार्थ्यांची यादी मोठी असते; त्यामुळे या कला महाविद्यालयांनी शासनाकडे विद्यार्थिसंख्या वाढवून देण्याची मागणी केली आहे.

कला महाविद्यालयांमधील प्रवेश असे -

  • दळवीज आर्टस

फौंडेशन : ४० विद्यार्थीफाईन आर्ट, इलिमेंटरी, इंटरमीजिएट, अ‍ॅडव्हान्स, डिप्लोमा : प्रत्येकी २० विद्यार्थी

  • कलानिकेतन

फौंडेशन : ३० विद्यार्थीअप्लाईड आर्ट : ३० विद्यार्थी

  • कलामंदिर

शिल्पकला : १५ विद्यार्थीचित्रकला : ३० विद्यार्थी 

 

टॅग्स :artकलाcollegeमहाविद्यालयkolhapurकोल्हापूर