शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातील शेंडा पार्कमध्ये ११०० बेडच्या हॉस्पिटलला प्रशासकीय मंजूरी

By विश्वास पाटील | Updated: December 1, 2023 13:55 IST

तीस एकरात होणार सुसज्ज हॉस्पिटल, मंत्री मुश्रीफ यांनी केले प्रयत्न

कोल्हापूर, : कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये ३० एकरांत एक हजार कोटींचे १,१०० बेडचे सर्व सोयी आणि सेवा- सुविधायुक्त अद्ययावत हॉस्पिटल होत आहे. या सर्व स्वतंत्र प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी येथे दिली.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लवकरच या कामाचे भूमिपूजन होणार आहे. दरम्यान; छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल म्हणजेच सीपीआरमध्ये अत्यावश्यक सोयी -सुविधा, अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनसाठी ४४ कोटी रुपये निधी मंजूर झाल्याचेही त्यांनी सांगितले.मंत्री मुश्रीफ म्हणाले, शेंडा पार्क येथे होत असलेल्या राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी एकूण ३० एकर जागा राखीव ठेवली आहे. ही जागा आणि संपूर्ण परिसर विकसित करण्याचे काम वैद्यकीय शिक्षण विभागाने युद्धपातळीवर हाती घेतलेले आहे. यामध्ये सामान्य रुग्णालय व बाह्य रुग्ण विभागासाठी ६०० बेड आहेत, २५० बेडचे स्वतंत्र अत्याधुनिक व अद्ययावत कॅन्सर हॉस्पिटल आणि २५० बेडचे सर्व सुविधांयुक्त सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अशी विभागणी आहे.शासन स्तरावरील ४५१ कोटींच्या तिन्ही स्वतंत्र प्रशासकीय मान्यता नुकत्याच मिळाल्या आहेत. हॉस्पिटलमधील सात मोड्युलर ऑपरेशन थिएटर, सीएसएसडी, इमारतींची आणि अंतर्गत रस्त्यांची देखभाल -दुरुस्ती यांच्या निधीसाठीही ७३ कोटींची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. इमारतींची बांधकामे पूर्ण झाल्यानंतर सर्व सेवा- सुविधा आणि परिसर सुधारणांसह या कामांवर एक हजार कोटींहून अधिक रुपये खर्च होणार आहेत.या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आवारातील ऑडिटोरियम हॉल, नवीन परीक्षा भवन, मध्यवर्ती ग्रंथालय इमारत, शव विच्छेदन गृह, मुलींचे वस्तीगृह या पाच इमारती ५८ कोटी निधीच्या खर्चातून पूर्णत्वाला आलेल्या आहेत. या कामांचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

दृष्टीक्षेपात हॉस्पिटल..

  • एकूण परिसर : ३० एकर
  • किती असतील बेड : ११००
  • न्यायवैद्यक शास्त्राची स्वतंत्र इमारत
  • निवासी डॉक्टर्स व आंतरवासिताकरिता पुरूष व महिला वसतिगृह- क्षमता प्रत्येकी २५०
  • मुले व मुलींचे वसतिगृह- क्षमता प्रत्येकी १५०
  • परिचारिका प्रशिक्षण केंद्र इमारत- क्षमता ३०

अत्याधुनिक उपचाराची सोय : मुश्रीफपालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, रुग्णसेवा हा माझा जिव्हाळ्याचा विषय. माझ्या जिल्ह्यातील अत्याधुनिक आरोग्यसंकुल ही सर्वोच्च समाधानाची बाब आहे. या आरोग्य संकुलाच्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांना वैद्यकीय सुविधा तर मिळतीलच. परंतु; मुंबईसारख्या मोठ्या शहरात होणारे कॅन्सरचे उपचारही कोल्हापुरातच मिळतील. पुण्या- मुंबईला जाऊन करावे लागणारे हृदय, यकृत प्रत्यारोपण, मेंदूच्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यासारखे विशेषोपचारही रुग्णांना कोल्हापुरातच मिळतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफhospitalहॉस्पिटल