शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाचे ठरेना, स्थलांतरितांना जाता येईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 17:08 IST

नाशिकमध्ये अडकलेल्या परप्रांतियांना विशेष रेल्वेने शनिवारी रवाना करण्यात आले. कोल्हापुरात मात्र अजूनही नोंदणीचीच प्रक्रिया सुरू आहे. त्याला गती येत नसल्यामुळे स्थलांतरितांची घालमेल वाढली आहे. जिल्हाधिकारी कधी आदेश काढतात, गाडीची व्यवस्था कधी करतात याकडे स्थलातरितांचे डोळे लागले आहेत.

कोल्हापूर : स्थलांतरितांना आपापल्या गावी परतण्याची मुभा केंद्र सरकारने दिली खरी पण अजूनही जिल्हा प्रशासनाकडून त्याच्या अंमलबजावणीविषयीचे नियोजन केलेले नाही. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून १६ निवारा केंद्रात अडकलेल्या ८३१ जणांचा जीव टांगणीला लागला आहे. घराकडे जायची ओढ लागली आहे, पण जाणार कसे याबाबत काहीच सूचना आलेल्या नसल्यामुळे या स्थलांतरितांची घालमेल वाढली आहे.

लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर घराच्या ओढीने निघालेल्या स्थलांतरितांना सक्तीने क्वारन्टाईन केले गेले. त्यांच्यात कोरोनाची लक्षणे नसली तरी पुढील धोका नको म्हणून निवारा केंद्र स्थापन करून त्यांची जेवण व निवासाची सोय सरकारने केली. गेल्या महिन्याभरापासून हे स्थलांतरित येथे रोजचा दिवस ढकलत आहेत. कोल्हापुरात सरकारने या स्थलांतरितांसाठी १६ निवारा केंद्रे स्थापन केली आहेत. त्यात ८३१ जण आहेत, त्यात १६८ जण राज्यातील तर तब्बल ६६३ जण परराज्यातील आहेत. यात कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, केरळ, पाँडेचरी, आंध्रप्रदेश, झारखंड, बिहार, हरियाणा या राज्यांतील नागरिकांचा समावेश आहे.या स्थलांतरितांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.

त्यानुसार समन्वय कक्ष स्थापना आणि नोंदणी प्रक्रिया सुरू केल्याचे प्रशासन सांगत असले तरी अजून कशाचा पायपोस कशाला नाही, अशी परिस्थिती आहे. नाशिकमध्ये अडकलेल्या परप्रांतियांना विशेष रेल्वेने शनिवारी रवाना करण्यात आले. कोल्हापुरात मात्र अजूनही नोंदणीचीच प्रक्रिया सुरू आहे. त्याला गती येत नसल्यामुळे स्थलांतरितांची घालमेल वाढली आहे. जिल्हाधिकारी कधी आदेश काढतात, गाडीची व्यवस्था कधी करतात याकडे स्थलातरितांचे डोळे लागले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस