शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

आदित्य ठाकरे पूरग्रस्त बापट कॅम्प, आंबेवाडी, चिखलीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 18:16 IST

कोल्हापूर : शिवसेना नेते व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागातील नागरिकांना भेटी देत शिवसेनेतर्फे ...

ठळक मुद्देआदित्य ठाकरे पूरग्रस्त बापट कॅम्प, आंबेवाडी, चिखलीत परिसरास भेट, मदतीचे वाटप

कोल्हापूर : शिवसेना नेते व युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी कोल्हापूर येथील पूरग्रस्त भागातील नागरिकांना भेटी देत शिवसेनेतर्फे सुरु असलेल्या शिवसहाय्य योजनेद्वारे मदत कार्यात ते सहभागी झाले. ते दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी सकाळी शाहू मार्केट यार्ड येथील बापट कॅम्प येथे कुंभार बांधवांच्या नुकसानीची पाहणी करुन पूरग्रस्तांशी संवाद साधला. यानंतर त्यांच्या हस्ते जीवनाश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, माजी महापौर मारुतराव कातवरे, ऋतुराज क्षिरसागर आदी उपस्थित होते.

आंबेवाडी, चिखली गावांना भेट यानंतर आदित्य ठाकरे यांनी पूरबाधित आंबेवाडी व चिखली या गावांना भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. आंबेवाडी येथील हनुमान मंदिर आणि चिखली येथील डी.एड. कॉलेज येथे येथे त्यांच्या हस्ते पूरग्रस्त नागरिकांना साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरAditya Thackreyआदित्य ठाकरेkolhapurकोल्हापूर