शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरचे अमित बोरकर उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 12:02 IST

कोल्हापूर येथील अ‍ॅड. अमित भालचंद्र बोरकर यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली. सुमारे २५ वर्षांहून अधिक काळ वकिली व्यवसायात असलेल्या बोरकर यांनी शिवाजी विद्यापीठाचे विधि सल्लागार म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या नियुक्तीने कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरचे अमित बोरकर उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीशकोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

कोल्हापूर : येथील अ‍ॅड. अमित भालचंद्र बोरकर यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून शपथ ग्रहण केली. सुमारे २५ वर्षांहून अधिक काळ वकिली व्यवसायात असलेल्या बोरकर यांनी शिवाजी विद्यापीठाचे विधि सल्लागार म्हणून प्रभावी कामगिरी बजावली आहे. त्यांच्या नियुक्तीने कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्राजोग यांनी न्यायाधीश बोरकर यांना अतिरिक्त न्यायाधीश पदाची शपथ दिली. मूळचे कोल्हापूर येथील असलेल्या बोरकर यांनी जुलै १९९४ ते मे १९९७ या कालावधीत कोल्हापूर जिल्हा, दिवाणी न्यायालयांसह अन्य प्राधिकरणांवर काम केले आहे. त्यांनी दिवाणी, घटनात्मक, सहकार, शिक्षण, व्यापार कायदे, शैक्षणिक, सेवा, आदी विषयांतील खटल्यांचे कामकाज पाहिले आहे.

जून १९९७ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रधान पीठासमोर ते काम करीत आहेत. सन २००९ पासून त्यांनी शिवाजी विद्यापीठाचे विधि सल्लागार म्हणून काम पाहिले. याखेरीज महाराष्ट्र नॅशनल लॉ विद्यापीठ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांचेही विधि सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

न्या. बोरकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शनिवार ब्रँच शाळा, न्यू हायस्कूल येथे झाले. विवेकानंद महाविद्यालय व शहाजी विधि महाविद्यालय येथे उच्च शिक्षण झाले आहे. 

 

टॅग्स :Courtन्यायालयkolhapurकोल्हापूर