शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘आदर्श’च्या अध्यक्षासह आठजणांना अटक-कोेथळीतील फसवणूक प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 00:30 IST

सहायक धर्मादाय उपायुक्तांचा बोगस आदेश तयार करून फसवणूक केल्याप्रकरणातील कोथळी (ता. शिरोळ) येथील आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिवांसह आठजणांना जयसिंगपूर

ठळक मुद्देआरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी

जयसिंगपूर : सहायक धर्मादाय उपायुक्तांचा बोगस आदेश तयार करून फसवणूक केल्याप्रकरणातील कोथळी (ता. शिरोळ) येथील आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, सचिवांसह आठजणांना जयसिंगपूर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. संशयित आरोपींना प्रथम वर्ग न्यायालयात उभे केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. या प्रकरणात एकूण ११ संशयित आरोपींचा समावेश आहे.

अध्यक्ष आदगोंडा बाबगोंडा पाटील (वय ७७), सचिव बापूसो आण्णा इंगळे (६९), सदस्य सातगोंडा सूरगोंडा पाटील (७१), नेमिशा आण्णा मगदूम (७४), देवाप्पा भाऊ नांद्रे (८०), आण्णा दादा कुरडे (५७), गजेंद्र आप्पासाहेब बोरगावे (५०), राजगोंडा शामगोंडा पाटील (६९, सर्व रा. कोथळी, ता. शिरोळ) या आठ जणांना अटक करण्यात आली असून, संस्थेचे उपाध्यक्ष भीमगोंडा कल्लाप्पा बोरगावे (५०), इजाज अहमद कमरुद्दीन शरिक मसलत (४५, रा. माळी गल्ली, दर्ग्याजवळ, मिरज) व दस्तगीर सिकंदर मुल्ला (रा. हसूर दुमाला, ता. करवीर) अशी अन्य तीन संशयितांची नावे असून, त्यांना अद्याप अटक झालेली नाही.

कोथळी येथील आदर्श शिक्षण संस्थेला अल्पसंख्याक प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्तांचा बोगस आदेश काढून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडे वर्ग झाला होता. संशयितांचा तपास केल्यानंतर आदर्श शिक्षण संस्थेतील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिवासह नऊ संचालकांची नावे निष्पन्न झाली होती. तर यामध्ये आणखी दोघांचा समावेश आहे. दरम्यान, संशयित आरोपींचा मुंबई उच्च न्यायालयानेही अटक पूर्व जामीन फेटाळला होता.बनावट शिक्का जप्त करण्यासाठी कोठडी हवीशुक्रवारी (दि. २२) संशयितांना जयसिंगपूर न्यायालयात हजर करण्यात आले. धर्मादाय आयुक्तांंचा बनावट शिक्का जप्त करण्याबरोबरच हा आदेश कोठे तयार करण्यात आला? हा कट कोठे रचण्यात आला? या गुन्ह्यामध्ये आणखी कोण साथीदार आहेत? याचा सखोल तपास करण्यासाठी संशयितांना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, असा युक्तिवाद सरकारी वकील सूर्यकांत मिरजे यांनी केला. यावेळी न्यायालयाने संशयितांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMurderखूनPoliceपोलिस