शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकर्त्याची अधिकाऱ्यांना दादागिरी, कोल्हापूर महापालिकेच्या चार अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 17:25 IST

एकेरी भाषेत शिवीगाळ करत ‘तुला बघतोच थांब’ अशा शब्दातही कार्यकर्त्याने अधिकाऱ्याला दरडावले

कोल्हापूर : विनामोबदला समाजसेवा करत असल्याच्या आविर्भावात विविध समित्यांवर सदस्य म्हणून काम करणाऱ्या एक कार्यकर्त्याच्या अरेरावीमुळे महानगरपालिकेचे अधिकारी हादरून गेले आहेत. या कार्यकर्त्याच्या जाचाला तसेच त्याच्याकडून होणाऱ्या अरेरावीला कंटाळून महापालिकेतील ठोक मानधनावर काम करणाऱ्या तीन अधिकाऱ्यांनी आपली नोकरी सोडली आहे.पाच-सहा दिवसांपूर्वी महानगरपालिकेतील एका अधिकाऱ्याचा याच कार्यकर्त्याने कोल्हापुरी अश्लील भाषेत उद्धार केल्याचा प्रकार घडला, त्यानंतर या कार्यकर्त्याचे कारनामे ऐकायला मिळू लागले आहेत. बाहेरगावाहून आलेले अधिकारी घाबरून गेले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत आणि कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर भाग घेऊ, अशी भूमिका घेतल्याने अधिकाऱ्यांची अवस्था ‘इकडे आड तिकडे’ विहीर झाली आहे.पाच-सहा दिवसांपूर्वी या कार्यकर्त्याला मीटिंग रद्द झाल्याचे सांगायला विसरून गेल्यामुळे अधिकाऱ्याला त्याच्या शिव्या खाव्या लागल्या. निरोप देण्याचे हे निमित्त झाले असले तरी यापूर्वी या अधिकाऱ्याने त्याचे म्हणणे ऐकून न घेतल्याचा राग त्याने काढल्याचे सांगितले जाते. हा अधिकारी एकदा नाही दहा वेळा ‘साहेब माझे ऐकून तरी घ्या’ असे सांगत असताना त्याला एकेरी भाषेत शिवीगाळ केली. ‘तुला बघतोच थांब’ अशा शब्दातही कार्यकर्त्याने अधिकाऱ्याला दरडावले आहे. सुमारे वीस मिनिटे या अधिकाऱ्याला शिव्या घालण्यात कार्यकर्त्याने धन्यता मानली आहे.महापालिकेच्या उद्यान विभागाकडे सहायक बागा अधीक्षक हे पद ठोक मानधनावर भरले जाते; पण याच सहायक बागा अधीक्षकांना सर्वाधिक त्रास या कार्यकर्त्याने दिला आहे. आतापर्यंत तीन सहायक बागा अधीक्षक त्याच्या त्रासाला कंटाळून नोकरी सोडून गेले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर ऊठबस आणि शासन नियुक्त समितीवर सदस्य असल्याने आपली बाजू कोणी घेणार नाही या एकाच नैराश्येतून त्यांनी नोकऱ्या सोडल्या आहेत.

सध्याच्या दोन सहायक अधीक्षकांना मी सांगतो म्हणून कामावरून कमी करा, असा आग्रह कार्यकर्त्याने धरला आहे. परंतु त्याच्या आग्रहाकडे फारसे कोणी लक्ष दिलेले नाही. त्यामुळेच कार्यकर्त्याची आगपाखड झाली असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर