शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus kolhapur updates-सर्वाधिक रुग्णसंख्येचा विचार करून यंत्रणा सक्रिय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 20:21 IST

corona virus kolhapur-कोरोनाचा वाढत्या संसर्गाशी सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्वाधिक रुग्णसंख्येचा विचार करून आरोग्यसेवा तयार ठेवाव्यात, कोल्हापूर महापालिकेने स्वतंत्र बैठक घेऊन नियोजन करावे तसेच सीपीआरने पुन्हा एकदा यंत्रणा सक्रिय करावी, बंद असलेले व्हेंटिलेटर्स दुरुस्त करून घ्यावेत, अशा सूचना सोमवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केल्या.

ठळक मुद्देसर्वाधिक रुग्णसंख्येचा विचार करून यंत्रणा सक्रिय करा आढावा बैठकीत मंत्र्यांची सूचना : कोरोनाशी लढण्यासाठी प्रशासन सज्ज

कोल्हापूर : कोरोनाचा वाढत्या संसर्गाशी सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्वाधिक रुग्णसंख्येचा विचार करून आरोग्यसेवा तयार ठेवाव्यात, कोल्हापूर महापालिकेने स्वतंत्र बैठक घेऊन नियोजन करावे तसेच सीपीआरने पुन्हा एकदा यंत्रणा सक्रिय करावी, बंद असलेले व्हेंटिलेटर्स दुरुस्त करून घ्यावेत, अशा सूचना सोमवारी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केल्या.वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, वैद्यकीय रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे आदी उपस्थित होते.मंत्री मुश्रीफ म्हणाले, एप्रिलअखेर संभाव्य वाढणारी रुग्णसंख्या लक्षात घेऊन कोविड काळजी केंद्र सुरू करावेत. खाटांची संख्या कमी पडणार नाही याबाबत तयारी ठेवावी. लक्षणे दिसताच तपासणीबाबत प्रबोधन करावे. विनामास्क नागरिकांवर पोलिसांनी कारवाई करावी, कारखानदारांची बैठक घेऊन कामगारांच्या लसीकरण आणि आरटीपीसीआर तपासणीबाबत नियोजन करावे.पालकमंत्री पाटील म्हणाले, सीपीआरमधील उपलब्ध खाटांच्या माहितीसाठी देण्यात आलेले मोबाइल रिचार्ज करून पुन्हा सक्रिय करावेत. प्रत्येक तालुक्यात कोविड काळजी केंद्राची तयारी ठेवावी. जिल्ह्यात रेमडेसिवीरचा साठा ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने आपली जबाबदारी पार पाडावी. महापालिका हद्दीत रिक्षा फिरवून जनजागृती करावी. खाटांची संख्या, उपचार घेणारे रुग्ण याबाबत स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून नियंत्रण ठेवावे. पोलीस विभागाने गृहरक्षक दल मागणीबाबत प्रस्ताव पाठवावा.मंत्री यड्रावकर म्हणाले, सीपीआरमध्ये उपचारासाठी मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात. येथे खाटांची कमतरता भासणार नाही याबाबत योग्य नियोजन करावे. बंद व्हेंटिलेटर्स तात्काळ दुरुस्त करून घ्यावेत.जिल्हाधिकारी देसाई यांनी प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे कोविड काळजी केंद्र सुरू करण्यात आली असून सद्य:स्थितीत आणि संभाव्य रुग्णसंख्या गृहीत धरून नियोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर