शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२५: ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, येणी वसूल होतील; सरकारी लाभ
3
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक
4
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
5
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
6
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
7
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
8
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
9
तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले
10
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
11
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
12
जामीन अर्जाविरोधात अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही; खालिद, शार्जिलवरून कोर्टाने दिल्ली पोलिसांना फटकारले
13
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
14
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
15
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
16
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
17
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
18
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
19
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
20
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!

रंकाळा विकासाचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ कागदावरच

By admin | Updated: December 27, 2014 00:19 IST

नेते, प्रशासनाची बघ्याची भूमिका : तत्काळ काम सुरू होणे गरजेचे

कोल्हापूर : रंकाळ्यासाठी १०० कोटींचा निधी द्या, अशी मागणी वर्षभरापूर्वी शासनाकडे करून महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी बघ्याच्या भूमिकेत आहेत. कामे पूर्ण न करताच पहिल्या टप्प्यातील खर्चाचा हिशेबाचा ताळेबंद मात्र प्रशासनाने तयार केला आहे. रंकाळ्याच्या ढासळणाऱ्या संरक्षक भिंती, खराब रस्त्यांमुळे पसरलेले धुळीचे साम्राज्य, नावालाच असलेले बगीचे, कागदावरचाच नौकाविहार, दररोज मिसळणाऱ्या दहा एमएलडी मैलामिश्रित सांडपाण्यामुळे काळे-निळे होणारे पाणी, आदी समस्यांनी रंकाळ्याला घेरले आहे. मात्र, रंकाळ्याची समस्यांच्या गर्तेतून सोडवणूक कधी होणार, या प्रश्नाचे उत्तर कोणाक डेच नाही.केंदाळ समूळ नष्ट करण्यासाठी १५ लाख रुपये खर्च करून विव्हिल किडे सोडण्यात आले; पण ते कमी झाली नाही. आता पुन्हा केंदाळाचे दुखणे वर तोंड काढत आहे. बोट खरेदी करण्याकरिता ४५ लाखांची तरतूद केली; पण गेल्या तीन वर्षांत अद्याप ती खरेदी केली नाही. यापूर्वी आणलेल्या बोटी चोरीला गेल्या, असे सांगून प्रशासन हात वर करीत आहे. ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करण्यापलीकडे प्रशासनाची मजल गेलेली नाही. इराणी खणीचा गाळ काढून ते पाणी पाईपमध्ये सोडल्याने गाळ अडकून ड्रेनेज लाईनची क्षमता कमी झाल्याची चर्चा आहे. मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे रंकाळ्याच्या पाण्याचा रंग बदलू लागला आहे. अतिरिक्त झालेले पाणी बाहेर जाण्यासाठी असणारे व्हॉल्व्ह पुन्हा सुरू करून रंकाळ्यातील संपूर्ण पाणी उपसून गाळ काढण्याची गरज आहे. तटबंदीचे वयोमान संपल्याने तिच्या संपूर्ण मजबुतीकरणाची गरज आहे. नैसर्गिक पुनर्भरणासाठी नाशिकच्या धरण सुरक्षा संस्थेच्या तज्ज्ञांची मदत घेऊन तत्काळ निधीची उपलब्धता करून काम सुरु करणे गरजेचे आहे. रंकाळ्यात मिसळणारे सांडपाणी बंद करणे गरजेचे आहे. येत्या २४ तासांत हे मिसळणारे पाणी बंद झाले तरी रंकाळ्याचे नैसर्गिक पुनर्भरण होण्यास दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. नैसर्गिक पुनर्भरण झाल्याखेरीज रंकाळ्याचे दुखणे कमी होणार नाही. प्रशासकीय उदासीनताच रंकाळ्याच्या मुळावर उठली आहे. - उदय गायकवाड(पर्यावरण अभ्यासक)केंद्राला १०४ कोटींचा आराखडा सादर : धनंजय महाडिककोल्हापूरचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाचा १०४ कोटी रुपयांचा विकास आराखडा केंद्राला सादर केला आहे. त्यासाठी पाठपुरावाही सुरू आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. रंकाळा संवर्धन व संरक्षण समिती व रंकाळा प्रेमींच्यावतीने आज, शुक्रवारी सायंकाळी रंकाळा तलाव पदपथ उद्यान येथे आयोजित ‘रंकाळा दिवस’ या कार्यक्रमात ते बोलत होते. रंकाळा उद्यान येथे झालेल्या या कार्यक्रमात रंकाळा येथे झाडांची लागवड व संवर्धन व स्वच्छता मोहिमेत योगदान देणाऱ्या श्रीकांत कदम, सुभाष हराळे, गुंडोपंत जितकर, अजित मोरे, जमीर मुजावर, भीमराव तिरमारे यांचा रोप देऊन खासदार महाडिक यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सायंकाळी सुनील सुतार, सुरेश शुक्ल यांंचा ‘स्वरनिनाद’ निर्मित ‘शब्दसुरांच्या झुल्यावर’ हा गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. राजेंद्र पाटील यांनी स्वागत, तर चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी संजय शिंदे, अभय देशपांडे, पृथ्वीराज पाटील, रवींद्र वडगावकर, अजित राऊत, अनिल काकडे, विनायक भोसले, अ‍ॅड. अजित चव्हाण, जगदीश रांगोळे, सागर नालंग, रवी तांबट, पवन जमादार, सुधीर भांबुरे, विकास जाधव, आदी उपस्थित होते.