इचलकरंजी : विना नंबरप्लेट वाहनावरून आलेल्या व्यक्तींनी चौदा तोळे सोन्याची लूट केली. या प्रकरणातून धडा घेतलेल्या वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपासून विना नंबरप्लेट व फॅन्सी नंबरप्लेटच्या वाहनांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईत ५६ वाहने जप्त करून अकरा हजार ६०० रुपये दंड वसूल केला.
अवैध व्यावसायिक, चोर, गुटखा तस्कर अशा अनेक गुन्हेगारांकडून विना नंबरप्लेट वाहन वापरले जात आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून शहरात बसविलेल्या सीसीटीव्हीचाही उपयोग पोलीस दलाला संशयितांचा शोध घेण्यासाठी होईना. त्यात दोन दिवसांपूर्वी विना नंबरप्लेटच्या मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी वृद्धाला फसवून चौदा तोळे सोने लुटून पोबारा केला. विविध ठिकाणच्या सीसीटीव्हीमध्ये ते दिसले असले तरी त्यांची ओळख पटली नाही. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी वाहतूक पोलिसांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली.
(फोटो ओळी)
०४१२२०२०-आयसीएच-०३
इचलकरंजीत वाहतूक पोलिसांनी विना नंबरप्लेट वाहनांवर कारवाई केली.
(छाया-उत्तम पाटील)