शहरं
Join us  
Trending Stories
1
Chandra Grahan: कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे 
4
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
5
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
6
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
7
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
8
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
9
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
10
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
11
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
12
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
13
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
14
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
15
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
16
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
17
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
18
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
19
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
20
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू

कर्णकर्कश हाॅर्न वाजविणाऱ्या सहाशेजणांवर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:36 IST

कोल्हापूर : कर्णकर्कश आवाजात वाहनांच्या हाॅर्नचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अचानक वाजविलेल्या हाॅर्नमुळे वाहनधारकांसोबत नागरिकांचे लक्ष विचलित ...

कोल्हापूर : कर्णकर्कश आवाजात वाहनांच्या हाॅर्नचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अचानक वाजविलेल्या हाॅर्नमुळे वाहनधारकांसोबत नागरिकांचे लक्ष विचलित झाल्यामुळे ते भयभीत होतात. अशा ५९३ वाहनचालक व मालकांविरोधात शहर वाहतूक शाखेने कायद्याचा बडगा उगारीत दंड वसूल केला आहे. बुलेटसारख्या दुचाकींच्या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा आवाज काढल्याबद्दलही दोघाजणांविरोधात कडक कारवाई केली आहे.

शहरातील काही भागात सायलेन्स झोन आहे. त्यात कर्णकर्कश हाॅर्न वाजवित शांतता भंग करण्याचे प्रमाण वाढले आहे. अवैधरित्या बसविण्यात आलेल्या कर्कश हाॅर्नमुळे ध्वनी प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल रुग्णालये, शाळा, महाविद्यालय व इतर संस्थांकडून पोलिसांकडे विनंती अर्ज करण्यात आले आहेत. कर्कश हॉर्नद्वारे होणारे प्रदूषण हा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असून त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची प्रत्येकाने दखल घेतल्यास प्रदूषणाला आळा बसेल. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कायद्यातील तरतुदीनुसार निश्चित केलेल्या हॉर्नचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कर्कश हॉर्नद्वारे होणारे प्रदूषण हा नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न असून त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची प्रत्येकाने दखल घेतल्यास प्रदूषणाला आळा बसेल. लाॅकडाऊन काळात कमी झालेले ध्वनी प्रदूषण लाॅकडाऊन उठल्यानंतर अचानकपणे वाढले. या ध्वनी प्रदूषणात सर्वाधिक गोंगाट वाहनांच्या कर्णकर्कश आवाजांचा आहे. वाहनांना सर्रासपणे वेगवेगळ्या आवाजातील हाॅर्न बसविण्यात आले आहेत. यासोबतच शहरात धावणाऱ्या बुलेटमध्येही तांत्रिक बदल करीत फटाका फुटल्याचे मोठे आवाज करण्यात आले आहेत. हा आवाज कानाला नकोसा असा असतो. त्यामुळे अशा ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.

हाॅर्नबाबत कायदा असा...

केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ चे नियम ११९ मधील तरतुदीनूसार वाहनांस इलेक्ट्रिक अथवा ए.आय.एस. मार्गदर्शक तत्त्वानुसार हाॅर्न बसविणे आवश्यक आहे. अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आपत्ती निवारकासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त कोणत्याही वाहनांना विचित्र आवाज करणारे, हाॅयड्रोलिक प्रेशर करणारे हाॅर्न, वाहन मागे घेतानाचे विविध आवाजातील हाॅर्न बसविण्यास बंदी आहे. या कायद्याचा भंग केल्यास चालक, मालकाविरोधात गुन्हा दाखल होऊन त्यात प्रत्येकी एक हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते. कायद्यात तरतूद नसलेले हाॅर्न विक्री करणे व ते बसविणेही कायद्याचा भंग आहे. अशांवरही कारवाईचा बडगा येऊ शकतो.

वर्षभरात ५९३ जणांवर कारवाई

गेल्या वर्षभरात शहर वाहतूक शाखेने कर्णकर्कश व म्युझिकल हाॅर्न बसविणाऱ्या ५९३ जणांविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडून पाचशे ते हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. कारवाईनंतरही जर या वाहनधारकांनी कृतीत बदल केला नाही, तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊ शकतो. फटाक्यांसारखे आवाज काढणाऱ्या दोन बुलेटधारकांविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्याकडूनही कृतीत बदल झाला नाही, तर गुन्हे दाखल होतील, अशी कडक समजही दिली आहे.

घाबरविणारे हाॅर्न

भीतीपोटी रडणारे बाळ, श्वान भुंकणारे, अचानक ब्रेक लागल्यानंतर वाहनाचा मोठा आवाज होणे, सायरनचेही हाॅर्न आदी हाॅर्न अगदी १२५ ते पाच हजारांपर्यंतची जोडी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे.

कोणालाच काही कसे वाटत नाही

प्रदूषण नियंत्रणकडून अशा प्रदूषण वाढविणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याकरिता कोणत्याही प्रकारची ध्वनी मोजण्याची यंत्रणा नाही. सामान्य नागरिकही तत्परतेने शहर वाहतूक शाखा अथवा प्रादेशिक परिवहनकडे तक्रार नोंदविता येत असतानाही त्याकडे डोळेझाक करतात. हाॅर्न व सायलेन्सरमध्ये बदल करून देणाऱ्या मेकॅनिक वर्गाचेही प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्याबाबत वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहनने कार्यशाळा घ्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांतून होत आहे.

कर्णकर्कश हाॅर्न कारवाई - ५९३

सायलेन्सरमध्ये बदल कारवाई - २

कोट

कायद्यातील तरतुदीनुसार निश्चित केलेल्या हाॅर्नचाच वापर करावा. कंपनीने ज्या पद्धतीनुसार बुलेटला सायलेन्सर दिले आहे, त्याप्रमाणेच वापरावेत. अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल.

- स्नेहा गिरी, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा