कोल्हापूर : केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून राज्यातील सत्तेतील नेत्यांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपचा आहे. जरंडेश्वर साखर कारखाना विक्री राज्य बँकेने केली. त्याच्या झालेल्या दोन्ही चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. तरीही ह्यईडीह्णमार्फत चौकशी लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्रास देण्याचा प्रयत्न असल्याची टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.मंत्री मुश्रीफ म्हणाले, भाजपच्या कार्यकारणी बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री अनिल परब यांच्या ह्यसीबीआयह्ण चौकशीचा ठराव केला. एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यकारणीत अशा प्रकारचा ठराव करणे, हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण आहे. राज्य सहकारी बँकेने रीतसर टेंडर काढून जरंडेश्वर साखर कारखान्याची विक्री केली. बँकेच्या कलम ८८ व निवृत्त न्यायाधीशांनी केलेल्या तपासणीत काहीही निष्पन्न झालेले नाही. राज्यातील मंत्र्याच्या स्वीय सहायकांना अटक करणे, त्यांची चौकशी करणे हे नवीन तंत्र भाजपने काढल्याचेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.उद्धव ठाकरे भला माणूसमंत्री असताना आपण हायब्रीड ॲन्युटी अंतर्गत झालेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशीची मागणी कशी करता? असे विचारले असता, मागील सरकारच्या काळात वृक्षलागवड, दुष्काळ व टँकरमध्ये भ्रष्टाचाऱ्याबाबत अनेक वेळा मंत्रिमंडळ बैठकीत आवाज उठवला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भला माणूस आहेत. भाजप कसा गैरफायदा घेते, सत्तेसाठी कशी भीती दाखवली जाते, हे आज त्यांना कळले असेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.पायऱ्यांवर बसावे लागल्याचे फडणवीसांना दु:खज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांचा बोलवता धनी देवेंद्र फडणवीस हेच आहेत. १०५ आमदार असूनही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसावे लागते, याचे दु:ख फडणवीस यांना आहे. पडळकर यांनी भान ठेवून बोलवे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाई अजित पवार यांना त्रास देण्यासाठीच : मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 19:59 IST
Politics Ajitdada pawar HasanMusrif Kolhapur : केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून राज्यातील सत्तेतील नेत्यांना त्रास देण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपचा आहे. जरंडेश्वर साखर कारखाना विक्री राज्य बँकेने केली. त्याच्या झालेल्या दोन्ही चौकशीत काहीही निष्पन्न झाले नाही. तरीही ह्यईडीह्णमार्फत चौकशी लावून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्रास देण्याचा प्रयत्न असल्याची टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
जरंडेश्वर कारखान्यावरील कारवाई अजित पवार यांना त्रास देण्यासाठीच : मुश्रीफ
ठळक मुद्देजरंडेश्वर कारखान्यावरील कारवाई अजित पवार यांना त्रास देण्यासाठीच : मुश्रीफहायब्रीड ॲन्युटी अंतर्गत लिंगनूर-मुद्दाळतिट्टा रस्त्याच्या कामाची चौकशी करणार