शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चार कोटीहून अधिकची फसवणूक, दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2021 18:07 IST

शिरोली : कमी किंमतीत सोने किंवा चार दिवसांत १० टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या हालोंडीच्या (ता.हातकणंगले) ...

शिरोली : कमी किंमतीत सोने किंवा चार दिवसांत १० टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून अनेकांना गंडा घालणाऱ्या हालोंडीच्या (ता.हातकणंगले) दत्तात्रय जामदार ऊर्फ डीजेला अखेर अटक करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून दत्तात्रय जामदार ऊर्फ डीजे हा फरार होता. धनादेश बाऊन्स प्रकरणी वडगाव न्यायालयाच्या आदेशानुसार शिरोली पोलिसांनी त्याला अटक केले आहे. त्याने सुमारे चार कोटीहून अधिक फसवणूक केल्याचे तपासात पुढे आले आहे.गेल्या दोन वर्षांपासून दत्तात्रय जामदार ऊर्फ डीजे हा देणेकऱ्यांना फसवून हुपरी रेंगाळ परिसरात राहत होता. त्यातच या प्रकरणात तक्रारदार पुढे न आल्याने हा तपास थांबला होता. पण सोने देऊ शकत नसल्याने जामदारने तक्रारदारांना धनादेश  देऊन स्वत:वरची कारवाई टाळली होती.

मात्र हालोंडी येथील सुरेश चौगुले व आण्णासाहेब चौगुले यांनी धनादेश वटला नाही म्हणून वडगाव न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने जामदारवर वॉरंट काढले होते. शिरोली पोलिसांनी जामदारला त्याच्या सासरवाडीतून शनिवारी चौकशीला ताब्यात घेतले. आणि रविवारी अटक केली. जामदार याने सुमारे पंधरा ते सतरा जणांना ५ कोटीहून अधिक  रुपयांचा गंडा घातला आहे. पैसे आणि सोने दोन्ही पैकी काहीच मिळत नसल्याने गुंतवणूकदार हवालदीन झाले होते. कमी किमतीत सोने खरेदी करण्यासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम गोळा केली. गुंतवणूकदारांना जानेवारी २०१९ पासून जामदार टोलवत होता.यातच सुशिल चौगुले व आण्णाप्पा चौगुले व्यक्तीना जामदार याने धनादेश दिला होता. हा धनादेश वटला नाही.म्हणून चौगुले यांनी न्यायालयात याचिका दाखल केली. आणि न्यायालयाने जामदार ऊर्फ डीजे याला अटक करण्याचे आदेश दिले. त्यावरुन शिरोली पोलीसांनी जामदार ऊर्फ डीजे याला हुपरी रेंदाळ येथून अटक केली आहे. याबाबत अधिक तपास सुरू असुन यात अजून कोल्हापूर मधील दोन मोठ्या व्यक्ती सापडणार असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी सांगितले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी