ज्योतीप्रसाद सावंत-आजरा येथे माजी आमदार के. पी. पाटील यांच्या आभार मेळाव्यात आजरा कारखान्याचे अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांनी संचालक प्रा. सुनील शिंत्रे, श्रीमती अंजनाताई रेडेकर यांनी अल्पदरात शेतकऱ्यांचा शेतातील उभा ऊस नफा मिळविण्यासाठी खरेदी केला असून, तो आजरा कारखान्याने लवकरात लवकर उचल करण्यासाठी कारखाना कार्यस्थळी गोंधळ घालत असल्याचा आरोप केल्याने कारखाना वर्तुळात खळबळ उडाली आहे.आठवड्याभरापूर्वी संचालिका श्रीमती अंजनाताई रेडेकर, शिवसेनेचे संभाजी पाटील, अनिरुद्ध रेडेकर, आनंदराव कुलकर्णी यांनी काही कार्यकर्त्यांसोबत ऊसतोड कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यस्थळी जाऊन अध्यक्ष केसरकर यांची भेट घेतली. प्रथम चर्चा, नंतर वाद त्यानंतर गोंधळ व शेवटी केसरकर यांचा अनिरुद्ध यांनी केलेला एकेरी उल्लेख असा प्रकार घडला. हा प्रकार अचानक घडला की, नियोजनपूर्वक घडवून आणला? याचे उत्तर सोशल मीडियाच्या माध्यमातून लक्षात येते.या प्रकाराने संचालक मंडळातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. बॉयलर प्रदीपन, गळीत प्रारंभ या कार्यक्रमांना संचालक असूनही प्रा. शिंत्रे, श्रीमती रेडेकर यांनी अनुपस्थिती दर्शविल्याबद्दल उपस्थितांमध्ये ‘उलटसुलट’ प्रतिक्रिया सुरू होत्या. झाल्या प्रकाराने दुखावलेल्या केसरकर यांनी संधी मिळताच प्रा. शिंत्रे व अंजनाताई यांच्यावर ‘ बॉंम्ब’ टाकला आहे. केसरकरांच्या या जाहीर आरोपाने निश्चितच खळबळ उडाली आहे. केसरकर यांच्यासारख्या जबाबदार पदाधिकारी बिनबुडाचे आरोप करेल, असे निश्चितच वाटत नाही. त्यामुळे हा नेमका प्रकार काय? याबाबत सभासदांमध्येही चर्चा सुरू झाली आहे.चराटी गटही अंतर राखूनसर्व पक्ष व गटांना एकत्र करून सत्तांतर घडवून आणलेल्या आजरा कारखान्यात प्रत्येक गटाचा सवतासुभा कायम आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अशोकअण्णा चराटीही राष्ट्रवादीशी अंतर ठेवून आहेत. अंजनातार्इंच्या गटाची अवस्थाही फारशी वेगळी नाही.अंतर्गत कुरघोड्या सुरूचकारखान्यामध्ये संचालक मंडळांतर्गत अंतर्गत परस्परविरोधी कुरघोड्या सुरूच आहेत. वेळोवेळी एकाच व्यासपीठावर दिसणारी संचालक मंडळी इतरवेळी मात्र एकमेकांची उणीदुणीच काढताना दिसतात.
केसरकरांच्या आरोपाने ‘कारखाना’ वर्तुळात खळबळ
By admin | Updated: November 28, 2014 23:42 IST