शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
4
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
5
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
6
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
7
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
8
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
9
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
10
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
13
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
14
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
15
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
16
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
17
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
18
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
19
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
20
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...

नवीन वाचनालयांची मान्यता ११ वर्षांपासून रखडली, अनुदान वाढीबरोबर दर्जातही बदलाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 12:55 IST

सध्या वाचनालय चालवताना चालकांसमोर आर्थिक प्रश्न गंभीर

सदाशिव मोरेआजरा : राज्य शासनाने गेल्या ११ वर्षांपासून नवीन शासनमान्य वाचनालयांना मान्यता व चालू वाचनालयांच्या दर्जातही बदल केलेले नाही. त्यामुळे नवीन व जुन्या वाचनालयांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा वाचनालयांचा कारभार सध्या उसनवारीवर सुरू आहे. वाचनालयांच्या अनुदान वाढीबरोबर नवीन मान्यता व जुन्या वाचनालयांच्या दर्जात बदल होणे गरजेचे आहे.वाचनाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. विविध क्षेत्रातील माहिती समजते. माणसाच्या व्यक्तिमत्वात मोलाची भर वाचनाने पडते. मोबाईलच्या युगात तरुणाई वाचनापासून दुरावत असताना वाचनालयांची वाचकांसाठीची धडपड कौतुकास्पद आहे.कोरोनानंतर पुन्हा पुस्तकात रमणारी माणसे आजही पाहायला मिळतात. यापुढील काळातही माणसाला समृद्ध करण्यासाठी वाचन चळवळ गरजेची आहे. वाचनालयाच्या माध्यमातून वक्तृत्व स्पर्धा, व्याख्यानमाला, ग्रंथोत्सव, नाट्य व साहित्य संमेलन, ग्रंथ दिंडी यासह विविध उपक्रम राबवून वाचकांना आकर्षित करण्यासाठी सतत धडपड सुरू असते.राज्यात २०११ पासून नवीन वाचनालयांना शासनाने मान्यता दिलेली नाही. त्यामुळे लोकसहभागातून ही वाचनालये सुरू आहेत. वाचनालय चालक  कर्ज काढून पुस्तक खरेदी पासून विविध कार्यक्रमांचा खर्च करीत आहेत. वाचन चळवळ वृद्धींगत होण्यासाठी शासनाने नवीन वाचनालयांना मान्यता व जुन्या वाचनालयांच्या वर्गवारीनुसार दर्जातही बदल करण्याची गरज आहे. सध्या वाचनालय चालवताना चालकांसमोर आर्थिक प्रश्न गंभीर आहे. समाजातील दानशूर व्यक्तीकडून देणगीच्या स्वरूपात निधी गोळा करून अजून किती दिवस वाचनालये सुरू ठेवणार हा प्रश्नही गंभीर आहे.वाचनालय कर्मचारी शासन सेवेपासून वंचितराज्यात १२१६५ सार्वजनिक वाचनालये असून २२ हजार कर्मचारी काम करीत आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी मिळणाऱ्या अनुदानातील ५० टक्के रक्कम खर्च केली जाते. अनुदानाचीच रक्कम कमी असल्याने तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते. वाचनालयातील कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव लालफितीत अडकला आहे.वाचनालयांच्या अनुदानाच्या रकमेत ६० टक्क्यांनी वाढसार्वजनिक वाचनालयाच्या अनुदानात ६० टक्क्यांनी वाढ करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मात्र चालू वर्षातील पूर्वीच्या अनुदानाप्रमाणे ५० टक्के अनुदान अद्याप मिळालेले नाही. वाढीव अनुदानाप्रमाणेच नवीन वाचनालयांना मान्यता, जुन्या ग्रंथालयांच्या दर्जात बदल व कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेणे यासाठी शेगाव येथे १४ व १५ जानेवारीला अधिवेशन होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlibraryवाचनालय