शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

कोल्हापूरच्या समृध्दीत भर, श्रीमंतीत पुण्यानंतर नंबर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 14:36 IST

नीती आयोगाच्या निर्देशांकानुसार गरिबीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक राज्यात २९ वा लागतो. येथील १० टक्के जनता गरिबी रेषेच्या खाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजाराम लोंढेकोल्हापूर : समृध्द शेती, रुजलेली सहकार चळवळ, अर्थकारणाची नाडी बनलेला साखर व दूध व्यवसाय आणि सतत नाविन्याची कास धरणारा उद्योग या घटकांनी कोल्हापूरला श्रीमंत बनवले असल्याचे अत्यंत दिलासादायक चित्र पुन्हा अधोरेखित झाले आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या गरिबी निर्देशांकामध्ये ही माहिती पुढे आली असून ती कोल्हापूरचे महाराष्ट्राच्या आर्थिक नकाशावरील स्थान दर्शवणारी आहे. जिल्हा अन्नधान्याकडून समृध्द असल्याने येथे कुपोषणाचे प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत १.८२ टक्के आहे. पिण्याचे पाणी, वीज, पक्की घरे यांसह शैक्षणिक सुविधांच्या पातळीवर जिल्हा आघाडीवर राहिला आहे.विभागात पुण्यानंतर कोल्हापूरच श्रीमंतनीती आयोगाच्या निर्देशांकानुसार गरिबीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा क्रमांक राज्यात २९ वा लागतो. येथील १० टक्के जनता गरिबी रेषेच्या खाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या शेजारील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा जिल्ह्यातील गरिबीचे प्रमाण कोल्हापूरपेक्षा अधिक आहे. पुणे विभागात कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे शहर व जिल्ह्यात ५.२९ टक्केच जनता गरिबी रेषेच्या खाली आहे. राज्याच्या तुलनेत गरिबीचे प्रमाण एकदम कमी असणाऱ्या जिल्ह्यात पुणे तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर पुणे विभागात पुण्यानंतर कोल्हापूरचा क्रमांक लागतो....यामुळे सुधारला आर्थिक स्तरकोल्हापूर जिल्ह्यातील ७० टक्क्याहून अधिक जमीन ही सिंचनाखाली असल्याने नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यातही शेतीला दूध व्यवसायाची जोड मिळाल्याने येथे बहुतांश कुटुंबे आपोआप सधन झाली आहेत. त्यामुळेच जिल्ह्याचा आर्थिक स्तर उंचावल्याने राज्याच्या तुलनेत गरिबीचे प्रमाण कमी दिसत आहे.

राज्यात गरिबीमध्ये टॉप टेन जिल्हे असे -

  • जिल्हा             गरिबीची टक्केवारी 
  • नंदुरबार           ५२.१२
  • धुळे                 ३३.२३
  • जालना            २९.४१
  • हिंगोली            २८.०५
  • नांदेड              २७.४८
  • यवतमाळ        २३.५४
  • परभणी            २३.३९
  • बीड                 २२.६६
  • वाशिम             २२.५३
  • गडचिरोली       २०. ५८

जिल्ह्यातील वस्तुस्थिती टक्केवारीमध्ये :

  • कुपोषणाचे प्रमाण - १.८२
  • माता-अर्भक मृत्यू - १८.४५
  • इंधन साधने - ४९.१२
  • बँकेत खाती नाहीत - १३.८२
  • पक्की घरे - ४८.६१
  • शौचालय - ३८.०९
  • अद्याप विजेच्या प्रतीक्षेत - १.४८
  • पिण्याचे पाणी - ७.८३
  • शाळाबाह्य विद्यार्थी - ३.९४

 

कोल्हापूर उद्योग आणि कृषी क्षेत्रात इतरांच्या तुलनेत पुढे आहे. दोन औद्योगिक वसाहती व त्यातील फौंड्रीमुळे रोजगार माेठ्या प्रमाणात आहे. इचलकरंजी तर रोजगार देणारे शहर बनले आहे. याचा एकत्रित परिणाम कोल्हापूरचा आर्थिक स्तर उंचावण्यास कारणीभूत आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्यातील गरिबीचे प्रमाण १० टक्क्यापेक्षाही कमी होऊ शकते. - प्रा. सुभाष कोंबडे, अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणे