मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील पिशवी येथील श्रीधर संजय व्हनागडे (वय १४ ) हा शालेय विद्यार्थी शिष्यवृत्तीची परीक्षा घरी देऊन परतत असताना ट्रॅक्टरच्या ट्रॉलीच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. याची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे.पिशवी येथील श्रीधर व्हनागडे हा इयत्ता आठवीत शिकत असून, स्कॉलरशिपची परीक्षा देण्यासाठी बांबवडे येथे गेला होता. परीक्षा संपल्यावर घरी जाण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमधून बसून घरी जात असताना, घाईने उतरण्याचे ठिकाण मागे गेल्याने चालत्या ट्रॅक्टरमधून खाली उडी घेतली असता, त्याच्या पाठीवरील दप्तराची बॅग ट्रॉलीच्या हुकात अडकून तो खाली पडला. त्याच्या अंगावरून ट्रॉलीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती शाहूवाडी पोलिस ठाण्याचे वाहतूक हवालदार काकास्वामी यांनी घटनास्थळी पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. विद्यार्थ्याच्या अपघातीमृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.
Kolhapur: ट्रॅक्टरमधून उडी घेताना दप्तर अडकून खाली पडला, परीक्षेहून परतताना विद्यार्थी जागीच ठार झाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 17:36 IST