शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांचा अपघाती मृत्यु, सव्वा कोटी भरपाईचे आदेश; विमा न उतरविणे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आले अंगलट

By समीर देशपांडे | Updated: January 17, 2023 19:07 IST

जिल्हा परिषदेकडील सर्व वाहने आणि त्यांच्या चालकांचा विमा उतरवण्याचा मुद्दा गांभीर्याने पुढे आला

समीर देशपांडेकोल्हापूर : आरोग्य विभागाच्या रुग्णवाहिका आणि चालकांचा विमा न उतरविणे कोल्हापूरजिल्हा परिषदेच्या अंगलट आले आहे. २०१५ साली झालेल्या अपघातात ठार झालेल्या डॉक्टरांच्या कुटुंबीयांना सुमारे एक कोटी ३२ लाख रुपयांची भरपाई द्यावी, असा आदेश बेळगाव जिल्हा न्यायालयाने दिला आहे. या अपघातात एकूण चौघांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे जिल्हा परिषदेकडील सर्व वाहने आणि त्यांच्या चालकांचा विमा उतरवण्याचा मुद्दा गांभीर्याने पुढे आला आहे.चंदगड तालुक्यातील हेरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. शंकर परशराम जंगले (मूळ रा. अहमदनगर) १५ आक्टोबर २०१५ रोजी सहकारी कर्मचाऱ्यांसह तिलारी भागात लसीकरणासाठी गेले होते. आरोग्य सेवक अर्जुन पाटील हे लवकरच निवृत्त होणार असल्याने सर्व मिळून संध्याकाळी परतताना तिलारीच्या सर्च पाॅईंटला गेले. या ठिकाणी चालक खाली उतरले असता आरोग्य सेवक शामराव संकपाळ यांनी गाडी चालवण्यास येत नसताना गाडी सुरू केली. या गडबडीत गाडी ग्रीलला धडकून दरीत कोसळली आणि त्यात चौघेजण ठार झाले. डॉ. जंगले यांच्यासह शामराव आनंदराव संकपाळ (रा. शिंगणापूर, ता. करवीर), अर्जुन भाऊराव पाटील (वय ५८, रा. कौलगे, ता. गडहिग्ंलज), कविता सदानंद देसाई (रा. चंदगड) यांचा मृतांत समावेश होता.यानंतर डॉ. जंगले यांचे वडील शंकर जंगले यांनी जिल्हा न्यायालय बेळगाव येथे नुकसान भरपाईचा दावा केला होता. याचा ५ फेब्रुवारी २०२१ रोजी निकाल होऊन संबंधितांना ९० लाख ७३ हजार ८८० रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश देण्यात आला. तसेच २०१६ पासून निकाल लागेपर्यंतच्या कालावधीचे ६ टक्क्याने ३२ लाख रुपये व्याज देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

जिल्हा परिषदेची कोंडीहे पैसे देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने नकार दिला आहे. इतके पैसे देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे निधीही नाही. शासनाकडे मागणी केल्यानंतर १९९५ च्या शासन आदेशाचा संदर्भ देत एकदा गाडी दिली की विमा, दुरुस्ती सर्व जबाबदारी त्या त्या संस्थेची असल्याचे सांगून त्यांनी हात झटकले आहेत. कर्नाटकच्या उच्च न्यायालयात जरी अपील दाखल करावयाचे असले, तरी नुकसानभरपाईच्या ५० टक्के म्हणजे किमान ४५ लाख रुपये भरण्याची गरज असल्याने आता त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. एकाला जर नुकसान भरपाई दिली, तर अन्य तिघांच्याही वारसांना ती द्यावी लागणार आहे.

निर्णय घेण्याची गरजअशा पद्धतीने कधीही कसाही अपघात होऊ शकतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व वाहनांसह चालकांचा विमा उतरवण्याचा धाेरणात्मक निर्णय जिल्हा परिषदेला घ्यावा लागणार आहे. आरोग्य खात्याची वाहने आणि चालक यांचा विमा उतरवण्यासाठी वर्षाला १० लाख रुपयांची गरज असते. मात्र, तो न उतरवल्याने येथे कोट्यवधीची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरzpजिल्हा परिषदdoctorडॉक्टर