शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरात शिवजयंतीच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 11:49 IST

Shivjayanti Kolhapur- कोल्हापूर शहरात शिवजयंतीच्या तयारीला वेग आला आहे. शुक्रवारी (दि.१९) शिवजयंती असून, बाजारपेठेत भगवे झेंडे, पताके विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर शिवाजी महाराजांच्या पुतळे खरेदीसाठीही गर्दी होत आहे. शिवाजी पेठेतही शिवजयंतीचे वातावरण सुरू झाले असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेत भगवे झेंडे, पताके खरेदीसाठी गर्दी शिवाजी तरुण मंडळाकडून उभा मारुती चौकात किल्ल्याची प्रतिकृती

कोल्हापूर : शहरात शिवजयंतीच्या तयारीला वेग आला आहे. शुक्रवारी (दि.१९) शिवजयंती असून, बाजारपेठेत भगवे झेंडे, पताके विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. याचबरोबर शिवाजी महाराजांच्या पुतळे खरेदीसाठीही गर्दी होत आहे. शिवाजी पेठेतही शिवजयंतीचे वातावरण सुरू झाले असून, तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.कोल्हापूरमध्ये १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कोरोना असल्यामुळे काही नियम व अटींचे पालन करून शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला आहे. बालचमूंसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गेल्या १५ दिवसांपासून याचे नियोजनही सुरू केले आहे. रुक्मिणीनगर येथे शिवाजी महाराज यांचे पुतळे करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुतळा खरेदीसाठी शिवप्रेमींची गर्दी होत आहे. बाजारपेठेतही शिवजयंतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध झाले आहे.शिवाजी पेठेची शिखर संस्था असलेल्या शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने दरवर्षी १९ फेब्रुवारी रोजी उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. यंदाही शिवजयंती उत्सव उत्साहातच करण्याचा निर्धार केला आहे. उभा मारुती चौकात भव्य असा २२ बाय ६० फुटाचा मंडप उभारला असून, त्यावर शिवकालीन किल्ल्याची प्रतिकृती उभारण्याचे काम सुरू आहे.

शिवाजी तरुण मंडळाच्यावतीने बुधवार (दि.१६) पासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. यामध्ये दुचाकी रॅलीकडून शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे आगमन होणार आहे. याचदिवशी नेत्रतपासणी, चष्मे वाटप होणार आहे. १७ रोजी पोवाडा, १८ रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, १९ रोजी मुख्य सोहळा, २० रोजी कोरोना योद्ध्यांचा सत्कार, २२ रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाची सांगता, असे भरगच्च कार्यक्रम नियोजित आहेत.फोटो : १२०२२०२१ कोल शिवजयंती न्यूज 

टॅग्स :Shivjayantiशिवजयंतीkolhapurकोल्हापूर