शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
4
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
5
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
6
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
7
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणलं; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचा लाड?
8
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
9
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
10
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
11
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
12
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
13
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
14
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
15
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
16
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
17
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
18
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
19
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
20
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

MS Dhoni: महेंद्रसिंग धोनीच्या नावाने कोल्हापुरात ॲकॅडमी; राज्यातील दुसरी तर, पश्चिम महाराष्ट्रात पहिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 12:48 IST

भारताचा माजी कसोटीपट्टू आणि माजी वेगवान गोलदांज, मुंबई रणजी ट्रॉफी निवड समितीचे अध्यक्ष सलिल अंकोला यांच्या हस्ते याचे उद्घाटन.

कोल्हापूर : क्रिकेटची परंपरा असणाऱ्या येथील शाहूपुरी जिमखानात राज्यातील दुसरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील पहिली महेंद्रसिंग धोनी ॲकॅडमीचे उद्घाटन रविवार, २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता होईल.भारताचा माजी कसोटीपट्टू आणि माजी वेगवान गोलदांज, मुंबई रणजी ट्रॉफी निवड समितीचे अध्यक्ष सलिल अंकोला यांच्या हस्ते याचे उद्घाटन होईल. खासदार संजय मंडलिक अध्यक्षस्थान भूषवतील, अशी माहिती माजी रणजी खेळाडू आणि पुण्यातील क्रिकेट मास्टर्स ॲकॅडमीचे अनिल वाल्हेकर, शाहूपुरी जिमखान्याचे अध्यक्ष विनोद कांबोज, उपाध्यक्ष रमेश पुरेकर, सचिव संजय शेटे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन चौगुले, माजी अध्यक्ष बाळ पाटणकर, चाटे शिक्षण समूहाचे भरत खराटे, माजी रणजीपट्टू शैलेश भोसले, ॲड. कमल सावंत, अभिषेक बोके आदी मान्यवर उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. महेंद्रसिंग धोनी क्रिकेट ॲकॅडमीची सुरुवात आरका स्पोर्ट्स् कंपनीने देशामध्ये केली. याच आरका स्पोर्ट्स् कंपनीशी पुण्याच्या क्रिकेट मास्टर्स ॲकॅडमीने करार केला. यांच्याशी करार करून शाहूपुरी जिमखाना, चाटे शिक्षण समूहाने येथे महेंद्रसिंग धोनी क्रिकेट ॲकॅडमीची सुरुवात येत्या रविवारी करण्यात येणार आहे.ॲकॅडमी वर्षभर सुरू ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्यात सराव करण्यासाठी जिमखान्यात इनडोअर सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. दहा, १२, १४, १६, १९, सिनियर अशा वयाच्या गटामध्ये विभागणी करून सराव शिबिरे घेण्यात येणार आहे. त्या-त्या वयोगटात जास्तीत जास्त सामन्यांचा अनुभवासाठी स्पर्धा चालवण्याबाबत नियोजन करणार येईल. प्रत्येक गटामध्ये जास्तीत जास्त २० खेळाडूंचा समावेश असेल.पत्रकार परिषदेला अमोल माने, चाटे शिक्षण समूहाचे भरत खराटे, धवल पुसाळकर, विजय भोसले, केतन शहा, दिवाकर पाटील उपस्थित होते.

नोकरीची हमी

सिनियर खेळाडूंना त्यांचे क्रिकेट संपल्यावर कोचिंग, अंपायरिंग, फिजिकल ट्रेनर इतर प्रकारामध्ये नोकरी मिळण्याबाबत प्राधान्य देण्याबाबत करार केला असल्याने लेव्हल एकची परीक्षा सुविधा देताना (नाममात्र फी भरून) नोकरीची हमी देण्याबाबत विचार केलेला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMS Dhoniमहेंद्रसिंग धोनी