शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ईडी’च्या गैरवापराची मोदींकडूनच कबुली, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2023 15:45 IST

हिंदू राष्ट्राच्या नावाखाली देशाला एका रंगात बांधण्याचा भाजपचा प्रयत्न

गडहिंग्लज : राष्ट्रपतींच्या लोकसभेतील अभिभाषणाच्या उत्तरादाखल केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ईडी’मुळेच विरोधक एकत्र आल्याची टीका करून ‘ईडी’च्या गैरवापराची अप्रत्यक्षरित्या कबुलीच दिली आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी (९) केला.एका घरगुती कार्यक्रमानिमित्त ते गडहिंग्लजला आले होते. दरम्यान, येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गडहिंग्लज विभागाचे समन्वयक विद्याधर गुरबे यांची प्रमुख उपस्थिती होती.सावंत म्हणाले, सरकारची ताकद देऊन उद्योजक मित्राला वाचवणारे मोदी त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे तो भ्रष्टाचार सरकार पुरस्कृतच आहे. परंतु, देशातील विरोधकांचा आवाज दडपण्यासाठीच ‘ईडी’ सारख्या शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे.हिंदू राष्ट्राच्या नावाखाली देशाला एका रंगात बांधण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. परंतु, विविधता मानणारा हिंदू धर्म आणि मर्यादा पुरुषोत्तम रामाची शिकवणच त्यांना कळालेली नाही. त्यांचा विचारच मुळात हिंदू धर्माच्या विरोधी आहे. सर्वसमावेशकता हाच देशाचा आधार असून, तोच देशाला तारेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.सावंत म्हणाले..!

  • मुश्रीफांच्या घरावर छापा पडल्यानंतर ‘दिल्लीवाल्यांनी वचन पाळलं’ या सोमय्यांच्या विधानातून काय ध्वनीत होते? वारंवार छापे टाकून मुश्रीफांना नाहक त्रासच दिला जात आहे.
  • देशातील गंभीर परिस्थितीत एकजूट महत्त्वाची असताना, राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. एक कार्यकर्ता म्हणून आपल्यालाही त्याचे दु:ख आहे. परंतु, ही पक्षांतर्गत बाब असून, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी याबाबत योग्य निर्णय घेईल.
  • सतेज पाटील यांच्या रूपाने उमदे नेतृत्व काँग्रेसला मिळाले आहे. त्यांची गुणवत्ता पक्षासमोर आहे. त्यामुळे माणिकराव ठाकरेंप्रमाणे त्यांच्या रूपाने मोठी जबाबदारी भविष्यात कोल्हापूरकडे नक्कीच येईल.

भाकड गाई त्यांच्या दारात बांधागोहत्या बंदीमुळे निर्माण झालेला भाकड गाईंचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मोदींनी उत्तरप्रदेश व बिहारच्या निवडणुकीत दिले होते. परंतु, निवडणुकीनंतर त्यांना त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे १४ फेब्रुवारीला ‘काऊ-डे’ साजरा करणाऱ्या भाजपवाल्यांनी वर्षभर ‘काऊ-डे’ साजरा करावा. स्मृती इराणींच्या हॉटेलमध्येही तो साजरा करावा. त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या भाकड गाई भाजप नेत्यांच्या दारात बांधाव्यात, असा टोमणाही सावंत यांनी लगावला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNarendra Modiनरेंद्र मोदीSachin sawantसचिन सावंत